रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत फिरताना पाहून संतापला होता सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:05 PM2023-01-26T18:05:50+5:302023-01-26T18:06:22+5:30
Ranbir Kapoor And Katrina Kaif : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ने आज भलेही आलिया भटशी लग्न केले असले तरी एक काळ असा होता जेव्हा तो आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या अफेयरच्या खूप चर्चा ऐकायला मिळत होत्या. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या या फोटोंवर सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली होती. त्यावेळी तो खूप संतापला होता. तेव्हा सलमान खान म्हणाला होता की, त्याला कतरिना कैफचा हा फोटो मॉर्फ्ड आहे. तो म्हणाला होता की, कुणी सुट्टीवर गेले आहे आणि अशारितीने त्यांचे फोटो क्लिक करणे चुकीचे आहे. हे तुमच्या आई आणि बहिणीसोबतही होऊ शकते. सलमानने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, जर तुमच्या कुटुंबाचे फोटो अशा पद्धतीने सार्वजनिक झाले तर तुम्हाला कसे वाटेल?
रणबीर आणि कतरिना हॉलिडेला इबिजा (स्पेन)ला गेली होती त्यावेळी कोणत्या तरी फोटोग्राफरने त्यांचे फोटो क्लिक केले होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोवर रणबीर आणि कतरिनानेही आक्षेप घेतला होता आणि म्हटले होते की त्यांच्या प्रायव्हेसीची काळजी घ्यावी.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. आता कतरिना कैफने नाव विकी कौशलसोबत लग्न केले आहे.