सलमान खानला गाजाआड पोहोचविणाऱ्या ‘या’ व्यक्तीबद्दल झाला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 04:08 PM2018-04-06T16:08:22+5:302018-04-06T21:38:22+5:30

सलमान खानला तुरुंगात पाठविण्यामागे ज्या व्यक्तीचा हात आहे, त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा समोर येत आहे. काळवीटाची शिकार केल्यानंतर ज्या ...

Salman Khan was a great exposé about 'this' person who was driving the ghazals! | सलमान खानला गाजाआड पोहोचविणाऱ्या ‘या’ व्यक्तीबद्दल झाला मोठा खुलासा!

सलमान खानला गाजाआड पोहोचविणाऱ्या ‘या’ व्यक्तीबद्दल झाला मोठा खुलासा!

googlenewsNext
मान खानला तुरुंगात पाठविण्यामागे ज्या व्यक्तीचा हात आहे, त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा समोर येत आहे. काळवीटाची शिकार केल्यानंतर ज्या वन अधिकाºयाने सलमानला तुरुंगात पाठविले, त्यांनी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय) येथे प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यामुळेच त्यांना सलमान प्रकरणात कसून तपास करण्यास मदत झाली. जेव्हा या प्रकरणाचा निकाल समोर आला तेव्हा डब्ल्यूआयआयच्या वैज्ञानिकांनी तत्कालीन एसीएफ ललित बोरा यांच्या धाडस आणि शौर्याचे कौतुक केले. या वैज्ञानिकांच्या मते, ललित बोरा जेव्हा डेहराडून येथे प्रशिक्षण घेत होते, तेव्हा प्रचंड तणावात होते. 

सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाचा तपास ७ आॅक्टोबर १९९८ रोजी तत्कालीन सहायक वन संरक्षक (एसीएफ) ललित बोरा यांच्याकडे सोपविण्यात आला होता. बोरा यांनी या प्रकरणाचा अतिशय सखोल तपास करताना जिप्सी कार ताब्यात घेतली होती. या संपूर्ण प्रकरणाला अतिशय ताकदीने न्यायालयात सादर करण्यामागे ललित बोरा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. डब्ल्यूआयआयच्या वैज्ञानिकांच्या मते, २००१ मध्ये ललित बोरा जेव्हा डेहराडून येथील डब्ल्यूआयआय येथे पोहोचले होते, तेव्हा ते प्रचंड तणावात होते. त्यांनी या तणावाचे कारण सलमान खान सांगितले होते. 



त्यांनी डब्ल्यूआयआयमधून २००० ते २००१ यादरम्यान दहा महिन्याचा पीजी डिप्लोमा इन एडव्हान्स वाइल्डलाइफ मॅनेजमेंट हा कोर्स केला. या कोर्समध्ये त्यांनी वन्यजिवांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. त्यांच्याशी संबंधित अनेक पैलूंचे त्यांनी अतिशय बारकाईने अध्ययन केले. या कोर्सची ललित बोरा यांना सलमानचे प्रकरण हाताळताना आणि रिपोर्ट तयार करताना खूप मदत झाली. डब्ल्यूआयआयमधील वैज्ञानिकांच्या मते, ललित बोरा भलेही आता वन विभागाचे अधिकारी नाहीत, पण त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि वन्यजिवांप्रती त्यांच्यात असलेले प्रेम कधीच विसरले जाणार नाही. सध्या ललित बोरा प्रायव्हेट जॉब करीत आहेत. 

वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. वीपी उनियाल यांनी सांगितले की, ललितने डब्ल्यूआयआयमध्ये प्रशिक्षणादरम्यान वन्यजिवांशी संबंधित अनेक गोष्टींचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. आज डब्ल्यूआयआयच्या वेबसाइटवर ललित बोरा यांचे एल्युमिनाय यादीत २९० वे स्थान आहे. दरम्यान, ललित बोरा यांना त्यावेळी हे प्रकरण हाताळताना प्रचंड विरोध झाला. एकदा तर विचारपूस करताना रागाच्या भरात सलमानने त्यांच्यावर खुर्ची फेकली होती. बोरा यांनी त्यावेळी असेही म्हटले होते की, रिमाण्डदरम्यान एक डीएफओ सलमानला सिगारेट आणून देत असे. 

Web Title: Salman Khan was a great exposé about 'this' person who was driving the ghazals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.