"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:33 AM2024-10-31T10:33:49+5:302024-10-31T10:35:02+5:30
Somy Ali on Salman Khan : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सध्या चर्चेत आहे. ती अनेकदा सलमान खानबद्दल बोलत असते. मुलाखतीत तो पुन्हा एकदा सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईबद्दल बोलली आहे. तिने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केली आहे.
सलमान खान(Salman Khan)ची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) सध्या चर्चेत आहे. सोमीला सुपरस्टार सलमान खान आवडत नाही हे जगजाहीर आहे. ती अनेकदा सलमान खानबद्दल बोलत असते. मुलाखतीत तो पुन्हा एकदा सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईबद्दल बोलली आहे. तिने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केली आहे.
IANS शी खास संवाद साधताना सोमी अलीने सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सोमी अलीला विचारण्यात आले की सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांच्याशी चांगले संबंध ठेवतो, परंतु तिच्यासोबत नाही. यावर ती म्हणाली, "सलमान माझ्याशी जसा वागला, तसा इतर कोणाशीही वागला नाही. संगीता आणि कतरिनाला सलमानने मला जेवढं छळलं तेवढा त्रास दिला नाही."
ऐश्वर्यालाही दिली वाईट वागणूक
ती पुढे म्हणाली की, "त्याने ऐश्वर्याला खूप वाईट वागणूक दिली. मला वाटते की त्याने ऐश्वर्याच्या खांद्याचे हाड तोडले होते, पण, त्याने कतरिनाचे काय केले याबद्दल मला माहित नाही."
सलमान खानपेक्षा लॉरेन्स बिश्नोई आहे चांगला
सोमीने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केली आणि म्हणाली की, त्याने माझ्यासोबत जे केले त्यावरून मी म्हणू शकतो की लॉरेन्स बिश्नोई त्याच्यापेक्षा चांगला आहे. सलमानने एकदा तिला कसे मारहाण केली होती आणि तिच्या घरातील नोकराने दरवाजा ठोठावला आणि तिला मारहाण करू नका अशी विनंती केली.
सोमीची अवस्था पाहून तब्बूला कोसळलं होतं रडू
सोमीने पुढे सांगितले की, एकदा अभिनेत्री तब्बू तिची अवस्था पाहून रडली होती. तिने सांगितले की, "मला खूप पाठदुखी होत होती आणि बराच वेळ बेडवर पडून होते. माझी अवस्था पाहून तब्बू खूप रडली, पण सलमान तिला भेटायला आला नाही." तिने असेही सांगितले की तिची आई आणि तिच्या जवळच्या मित्रांशिवाय सलमानसोबतच्या तिच्या व्यवहाराबाबत कोणालाच पूर्ण माहित नाही. अभिनेत्रीने सांगितले की, ती सलमानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल एक पुस्तक लिहित आहे, ज्यामध्ये सर्वकाही तपशीलवार सांगितले जाईल.
...मग तिने सोडला भारत
अभिनेत्री सोमी अली नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. ती जवळपास आठ वर्षे सलमान खानसोबत रिलेशनशीपमध्ये होती. यानंतर सलमान ऐश्वर्या रायसोबत डेट करू लागल्यानंतर तिने १९९९ मध्ये भारत सोडला होता. ती स्वतःची एनजीओ 'नो मोअर टीयर्स' चालवते आणि मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचाराच्या बळींना मदत करते.