लहानपणी 'अख्तर चाचा'ने केला होता सलमान खानचा सांभाळ, आज तेच जगतायेत हलाखीचे जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:29 PM2020-12-29T14:29:08+5:302020-12-29T14:32:41+5:30
'मैने प्यार किया' सिनेमातील त्याच्या पदार्पणापर्यंत अख्तर चाचानेच सलमानची काळजी घेतली. सलमानला जेवणसुद्धा अख्तर चाचाच भरवायचे.
दबंग सलमान खानची प्रत्येक गोष्ट खास असते. मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते. भाईजान म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. सलमानही गरजु व्यक्तींना मदतीचा हात देत त्यांना आधार देतो. आजपर्यंत अनेकांना त्याने मदत केल्याची आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र सलमानच्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती आहे. ज्याच्या वाट्याला सध्या हलाखीचे जगणंच वाट्याला आले आहे. तो व्यक्ती आहे. अख्तर चाचा, दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार अख्तर चाचानेच सलमान खानला लहानपणी सांभाळले आहे.
@BeingSalmanKhan
— Yogi_Akhilesh (PTC) (@Yogi_Akhilesh_) December 27, 2020
जन्मदिवस पर अनंत शुभकामनाएं।#सलमान_खान आप के #अखतर_चाचा कर रहे है आपका इंतज़ार, भोपाल में गरीबी में पापड़ बेच कर गुजार रहे हैं अपना जीवन। #waiting of U #SalmanKhan#BeingHuman pls help him. pic.twitter.com/PwhqWpKoy1
इतकेच नाही तर सलमानच्या जन्मापासून ते 'मैने प्यार किया' सिनेमातील त्याच्या पदार्पणापर्यंत अख्तर चाचानेच सलमानची काळजी घेतली. सलमानला जेवणसुद्धा अख्तर चाचाच भरवायचे. एकेकाळी सलमानची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेणारे अख्तर चाचा आज भोपाळमध्ये
अत्यंत हलाखीची परिस्थिती सध्या ते जगत आहेत.
इतकेच काय तर दोन वेळच्या जेवनासाठी त्यांना अन्न मिळत नाही. अख्तर यांचा एक व्हिडीओस सध्या व्हायरल झाला आहे. यात ते सलमानच्या कुटुंबासह त्यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगत आहेत. एकदा तरी सलमानला पुन्हा भेटायचे आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. लाखो करोडों लोकांना मदत करणा-या सलमानच्या मदतीची आज अख्तर चाचा यांनाही खरी गरज आहे.
रेमोला वाटली अॅसिडीटी; देवदूतासारखा धावून आला सलमान
रेमोवर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लिजेलची अवस्था वाईट होती. रेमोच्या काळजीने तिचा धीर खचत चालला होता. ती रूग्णालयात एकटी होती. अशावेळी सलमान तिच्या मदतीला धावून आला. लिजेल व सलमानच्या फोन कॉलनंतर सलमानची अख्खी टीम डॉक्टरांच्या टीमशी पर्सनली संपर्कात होती. सलमानही वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क साधत होता. लिजेलला तो सतत हिंमत देत होता. सलमानशी बोलून लिजेल बरीच रिअॅक्स झाली. रेमोच्या प्रकृतीबद्दल तिने आपल्या दोन्ही मुलांनाही सांगितले नव्हते. त्यावेळी सलमानेच त्यांना आधार देत परिस्थिती सांभाळून घेतली होती.