सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:00 AM2018-11-17T06:00:00+5:302018-11-17T06:00:00+5:30

अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल.

Salman Khan's 'bhart' movie actors refused to shoot | सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

googlenewsNext
ठळक मुद्दे भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे

सलमान खानचा आगामी सिनेमा भारतचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. नुकताच सलमानने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या सलमानसोबत कॅटरिना (अंदाजे) वाघा बॉर्डरवर उभी आहे आणि दोघे पाकिस्तानच्या दिशेने बघतायेत. आता हा सिनेमा जरा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. 


त्याचे झाले असे ही यासिनेमातील सपोर्टिंग आर्टिस्टने त्यांना मिळणाऱ्या पैशांवरुन काम करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार भारतमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कलाकारांना 350 रुपयांचा चेक देण्यात आला होता मात्र तो चेक कॅश करताना बाऊंस झाला. त्यामुळे हे सपोर्टिंग आर्टिस्ट वैतागले आणि त्यांनी शूटिंग करण्यास नकार दिला. यानंतर दोन दिवसांनंतर काही लोकांना पैसे देण्यात आले.          


अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सलमान-कॅटशिवाय यात  तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’ हा सिनेमा ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

Web Title: Salman Khan's 'bhart' movie actors refused to shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.