सलमान खानने #BottleCapChallenge च्या निमित्ताने दिला हा सामाजिक संदेश, पाहा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:17 PM2019-07-15T13:17:28+5:302019-07-15T13:19:28+5:30
दबंग खान सलमान खानने त्याच्या हटके अंदाजात #BottleCapChallenge पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हॉलिवूड स्टार जेसन स्टेथमने #BottleCapChallenge ची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे चॅलेंज स्वीकारताना दिसले. हे चॅलेंज पूर्ण करतानाचा अक्षय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता दबंग खान सलमान खानने त्याच्या हटके अंदाजात #BottleCapChallenge पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे चॅलेंज स्वीकारताना त्याने एक सामाजिक संदेश देखील दिला आहे.
सलमान खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमान खान त्याच्या वर्कआऊटचे, त्याच्या फॅमिलिसोबतचे मजा-मस्तीचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सलमानने रविवारी त्याचा जीममधील एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत आपल्याला सलमान #BottleCapChallenge पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण सलमानचे हे चॅलेंज घेण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला सलमान बॉटलवरचे झाकण काढताना दिसत आहे आणि झाकण काढल्यानंतर तो लगेचच बॉटल तोंडावर लावत त्या बॉटलमधील सगळे पाणी संपवत आहे. या व्हिडिओच्या खाली लिहिण्यात आले आहे की, पाणी वाचवा...
सलमानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्याने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काहीच तासांत या व्हिडिओला ४७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर ३९ हजाराहून अधिकांनी कमेंट केले असून आतापर्यंतचा #BottleCapChallenge चा सगळ्यात चांगला हा व्हिडिओ आहे असे काहींचे म्हणणे आहे तर काहींनी पाणी उभे राहून पिऊ नये असा संदेश सलमानला दिला आहे.
सलमानने बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचा भारत हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. सध्या तो त्याच्या दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून या चित्रपटासाठी तो कित्येक किलो वजन कमी करणार आहे.