सलमान खानच्या मेहुण्याने सुरू केली ‘लवरात्री’ची शूटिंग, शेअर केला हा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 11:01 AM2018-03-04T11:01:46+5:302018-03-04T16:32:48+5:30

सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याने त्याच्या पहिल्या ‘लवरात्री’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमानची लहान बहीण ...

Salman Khan's brother-in-law started shooting 'Lavarati', shared this photo! | सलमान खानच्या मेहुण्याने सुरू केली ‘लवरात्री’ची शूटिंग, शेअर केला हा फोटो!

सलमान खानच्या मेहुण्याने सुरू केली ‘लवरात्री’ची शूटिंग, शेअर केला हा फोटो!

googlenewsNext
परस्टार सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याने त्याच्या पहिल्या ‘लवरात्री’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमानची लहान बहीण अर्पिता खानचा पती आयुष याने क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर करताना शूटिंगला सुरुवात केल्याचे सांगितले. अर्पितानेदेखील आयुषचा एक फोटो ट्विट करताना लिहिले की, ‘मी उत्साहित, नर्वस आणि चिंतेत आहे.’ अर्पिताने फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लवरात्रीची शूटिंग सुरू होताच उद्या (रविवारी) आयुष शर्माच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. बाय म्हणताना सर्वात अवघड होत आहे. मात्र त्याने त्याच्या या नव्या प्रवासाठीच मेहनत घेतली आहे. मी खूप उत्साहित, नर्वस आणि चिंतेत आहे.’

दरम्यान, आयुष शर्माचा ‘लवरात्री’ हा चित्रपट ५ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून वारिना हुसेन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट गुजरातच्या भूमीवर आधारित आहे. नवरात्री हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून, अभिनेता-अभिनेत्रीमधील प्रेमाची जुगलबंदी यात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा नरेन भट्ट यांनी लिहिली असून, अभिराज मीनावाला यांचे दिग्दर्शन आहे. 



दरम्यान, सलमान खाननेच मेहुणा आयुष शर्माला पहिला ब्रेक देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला आयुषबरोबर अभिनेत्री मौनी रॉय झळकणार असल्याची चर्चा होती. परंतु आयुषने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्याने तिचा पत्ता कट झाला. आता आयुषचा डेब्यू प्रेक्षक कितपत यशस्वी करतील, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Salman Khan's brother-in-law started shooting 'Lavarati', shared this photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.