‘ट्यूबलाइट’च्या ‘नाच मेरी जान’ या दुसऱ्या गाण्यात रंगली सलमान, सोहेल खानची केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 04:27 PM2017-06-01T16:27:33+5:302017-06-01T22:03:40+5:30

अभिनेता सलमान खान याच्या मोस्ट अवेटेड ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचे ‘नाच मेरी जान’ हे दुसरे गाणे आज रिलीज करण्यात आले आहे. गाण्यात सलमान आणि सोहेल खानची जबरदस्त ट्यूनिंग बघावयास मिळत आहे.

Salman Khan's Chemistry, 'Taillite', 'Nach Marie Jan' | ‘ट्यूबलाइट’च्या ‘नाच मेरी जान’ या दुसऱ्या गाण्यात रंगली सलमान, सोहेल खानची केमिस्ट्री!

‘ट्यूबलाइट’च्या ‘नाच मेरी जान’ या दुसऱ्या गाण्यात रंगली सलमान, सोहेल खानची केमिस्ट्री!

googlenewsNext
िनेता सलमान खान याच्या मोस्ट अवेटेड ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचे ‘नाच मेरी जान’ हे दुसरे गाणे आज रिलीज करण्यात आले आहे. गाण्यात सलमान आणि सोहेल खानची जबरदस्त ट्यूनिंग बघावयास मिळत आहे. काही दिवसांपासून चित्रपट निर्माते दररोज या गाण्याशी संबंधित फोटोज् प्रेक्षकांपर्यंत पोहचवित होते. त्यामुळे या गाण्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर हे गाणे रिलीज करण्यात आले असून, प्रेक्षकांचा त्यास तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

या गाण्याचा ‘ब्रदर हुड’ हाच यूएसपी आहे. या अगोदर ‘रेडिओ सॉन्ग’ रिलीज करण्यात आले होते. आता हे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले असून, ते खूपच एंटरटेनिंग आहे. गाण्याचे लिरिक्स खूपच मजेशीर आहे. कारण एकदा गाणे ऐकल्यानंतर सलमानच्या चाहत्यांचे मन भरणार नाही. त्यामुळे लवकरच हे गाणे सलमानच्या चाहत्यांच्या मोबाइलमध्ये प्लेलिस्टचा भाग बनणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दरम्यान, गाण्यात सलमान आणि सोहेलची जोडी जबरदस्त असल्याचे बघावयास मिळत आहे. दोघांमधील जिगरी दोस्ती आणि भावाचे प्रेम हेच या गाण्यातील हाइलाइट आहे. त्यामुळे सलमानचे हे ‘नाच मेरी जान’ त्यांच्या चाहत्यांसाठी व्हिसुअल ट्रिट ठरण्याची शक्यता आहे. 



‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. त्यांचा सलमानसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. चित्रपटात सलमानची भूमिका अशा व्यक्तीची आहे, ज्याला कुठलीही गोष्ट समजून घेण्यात उशीर लागत असतो. त्यामुळेच त्याला ‘ट्यूबलाइट’ असे संबोधले जाते. चित्रपटात चिनी अभिनेत्री जू जू हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाची कथा भारत-चीन युद्धावर आधारित असून, या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची कथा ‘लिटिल बॉय’ या हॉलिवूडपटापासून प्रेरित आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत बराचसा फेरबदल केला असल्याने एक वेगळाच रोमांच प्रेक्षकांना अनुभवयास मिळणार आहे. हा चित्रपट ईदला रिलीज केला जाणार असून, सध्या चित्रपटाशी संबंधित सर्वच स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा असून, चित्रपट बॉक्स आॅफिसवर जोरदार मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Salman Khan's Chemistry, 'Taillite', 'Nach Marie Jan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.