सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने पुन्हा एकदा काढली भडास, म्हणाली- तो सुपरस्टार आहे, पण मी सत्य सांगणार..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:16 AM2023-07-10T11:16:55+5:302023-07-10T14:24:10+5:30
Somy Ali, Salman Khan : सोमी अलीच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.
एकेकाळी सलमान खान (Salman Khan) सोमी अलीच्या (Somy Ali) प्रेमात वेडा झाला होता. असं म्हणतात की, तिच्यासाठीच त्यानं संगीता बिजलानीला सोडलं होतं. अर्थात इतकं करूनही सलमान-सोमीचं नातं फार काळ चाललं नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून गेली ती कायमचीच. सोमा अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.
अलीकडेच सोमी अलीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. सोमी अलीने इंडस्ट्रीमध्ये तिच्याशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितले आहे.
इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट करत सोमी म्हणाली की, मला ही पोस्ट काढून टाकण्यास सांगितले जाईल. माझ्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित केले जातील आणि माझ्या मद्यपानाच्या वाईट सवयीबद्दल चर्चा केली जाईल, परंतु तरीही मी सत्य सांगेल.'' सोमीने तिच्या पोस्टमध्ये सलमान खान, सुभाष घई, जिया खान, बिल कॉस्बी आणि हार्वे वाइनस्टीन यांचे हॅशटॅग वापरले आहेत.
''तुम्ही तो अपमान आणि यातना सहन केल्या नाहीत, तर कोणीही माझी बाजू घेतली नाही, कारण अत्याचार करणारा मोठे स्टार होता आणि तुम्ही त्याचे मित्र आहात. तो तुमचे करियर बनवू किंवा खराब करू शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवला आणि ते तुमच्यासाठी उभे राहतील कारण त्यांना सर्व काही माहित होते. त्यांनी अनेकवेळा सगळ्या गोष्टी पाहिल्या.''
''एका चांगल्या व्यक्तिने मला सांगितले होते, की तुझ्यासोबत गैरवर्तन करणार माणूस की चांगला आहे. मी अशा एका अभिनेत्याबद्दल बोलत आहे ज्याच्याबद्दल मला खूप आदर आहे, परंतु मला हे देखील माहित आहे की त्याचे हात बांधले गेलेले आहेत.''
कोण आहे सोमी ?
सोमी मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते. सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. 12 वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. ‘मैंने प्यार किया’ पाहिल्यानंतर सलमानसोबतच लग्न करायचे, असे तिने ठरवले होते. सोमीचा कल बघून तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमान हवा होता. खरे सांगायचे तर सलमानचा पिच्छा करत करतच ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने 1991 ते 1997 या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. 1999मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही.