​सलमान खानने त्याच्या लहानपणीचा हा अनुभव केला शेअर... लहानपणी प्रवास करताना सलमानची व्हायची अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 04:56 AM2018-06-04T04:56:24+5:302018-06-04T10:26:24+5:30

दमदार सलमान खान २०१८ मधील सर्वात जास्त प्रतिक्षित कार्यक्रम दस का दम घेऊन आला आहे. हा कार्यक्रम तब्बल नऊ ...

Salman Khan's experience in his childhood was shared ... when Salman was traveling during his childhood | ​सलमान खानने त्याच्या लहानपणीचा हा अनुभव केला शेअर... लहानपणी प्रवास करताना सलमानची व्हायची अशी अवस्था

​सलमान खानने त्याच्या लहानपणीचा हा अनुभव केला शेअर... लहानपणी प्रवास करताना सलमानची व्हायची अशी अवस्था

googlenewsNext
दार सलमान खान २०१८ मधील सर्वात जास्त प्रतिक्षित कार्यक्रम दस का दम घेऊन आला आहे. हा कार्यक्रम तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमानचे चाहते हा कार्यक्रम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. या कार्यक्रमाचा हा तिसरा सिझन असून ४ जून पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सलमानने सुरुवात केली असून सलमानसाठी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच छान असल्याचे त्याने सांगितले. या कार्यक्रमाच्या एका चित्रीकरणाच्यावेळी सलमानने त्याच्या अनोख्या शैलीतून त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान अनुभव सांगितले.
उदयपूरमधील अभिषेक गर्ग आणि बरेलीमधील शमा परवीन हे प्रतिस्पर्धी पहिल्याच फेरीत एकमेकांशी स्पर्धा करत असताना सलमान खानने त्यांना एक प्रश्न विचारला. हा प्रश्न सलमानच्या हृद्याशी खूपच जवळचा होता. "आपल्या आईच्या मांडीवर झोपलेले असताना किती टक्के लोक शांती अनुभवतात?" या प्रश्नाने लगेचच सलमानसह सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले. 
सलमान हा सुपरस्टार असला तरी तो जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या कुटुंबियांसोबत घालवतो. सलमानचे आयुष्य त्याचे आईवडील आणि भावंडांभोवती फिरते. तो त्याच्या आईशिवाय राहूच शकत नाही असे त्याने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सलमान मुंबईत असला तर आजही त्याची आई तो आल्याशिवाय झोपत नाही हे देखील सलमानने अनेकवेळा सांगितले आहे. सलमानने त्याच्या आणि त्याच्या आईच्या नात्याविषयी बारीकसारीक गोष्टी दस का दम या कार्यक्रमात नुकत्याच सांगितल्या. सलमान सांगतो, मला माझ्या आईच्या हाताचा वास आवडतो. तिचा हात माझ्या डोक्यावर असला की, मला शांत झोप येते. मी लहान असताना मला कारमध्ये खूप त्रास होत असे. त्यामुळे प्रवासादरम्यान मी आईच्या मांडीवर आपले डोके ठेवून झोपत असे. आई तिचा हात माझ्या चेहऱ्यावर फिरवत असे आणि मी लगेचच झोपत असे. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला तिची नेहमीच काळजी वाटते. जे लोक आपल्या आईच्या मांडीवर झोपलेले नाहीत त्यांना तो स्वर्गीय अनुभव मिळत नाही असे मला वाटते.

Also Read : ​दस का दम सुरू व्हायच्या आधी सलमान खानने त्याच्या चाहत्यांना दिले हे गिफ्ट
 

Web Title: Salman Khan's experience in his childhood was shared ... when Salman was traveling during his childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.