जोधपूर मध्यवर्ती कारागृहातील सलमान खानचा पहिला व्हिडीओ आला समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 01:42 PM2018-04-05T13:42:34+5:302018-04-05T19:12:44+5:30

सलमान खानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून, त्याचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सलमान कारागृहात जाताना दिसत आहे.

Salman Khan's first video of Jodhpur Central Jail in front of you! | जोधपूर मध्यवर्ती कारागृहातील सलमान खानचा पहिला व्हिडीओ आला समोर!

जोधपूर मध्यवर्ती कारागृहातील सलमान खानचा पहिला व्हिडीओ आला समोर!

googlenewsNext
लिवूड सुपरस्टार सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोेठावला आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच पोलिसांनी सलमानला ताब्यात घेत त्याची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात केली. आता कारागृहात जात असतानाचा सलमानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा शर्ट आणि डार्क ब्लू जीन्समध्ये असलेला सलमान कारागृहात जात असताना दिसत आहे. या अगोदर सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला किमान एक रात्र कारागृहात काढावी लागणार आहे. सलमान खानच्या या प्रकरणाचा १९६ पानांचा निकाल आहे. 
 

दरम्यान, या प्रकरणातील अन्य सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष मुक्तता केली. तर सलमानला शिक्षा ठोठावताना त्याची रवानगी कारागृहात केली. दरम्यान, शिक्षा ठोठावण्याअगोदर सरकारी वकिलांनी सलमानला अधिकाधिक शिक्षा ठोठावण्याची मागणी केली. तर सलमानच्या वकिलांनी कमीत कमी शिक्षा ठोठावली जावी, असा युक्तिवाद केला. त्याचबरोबर या प्रकरणातील अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने सरकारी वकिलांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते सलमानसोबत या सर्वांनाच याप्रकरणात शिक्षा व्हायला हवी. 
 

मुख्य ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट देवकुमार खत्री यांनी १९९८ मध्ये झालेल्या या घटनेसंबंधीची सुनावणी पूर्ण करताना निकाल नंतर जाहीर करण्याचे घोषित केले होते. त्यानुसार आता या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. निकालच्या सुनावणीप्रसंगी न्यायालयात सलमानसह सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आदी उपस्थित होते.

Web Title: Salman Khan's first video of Jodhpur Central Jail in front of you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.