सलमान खानला ‘जेल’ की ‘बेल’? काळवीट शिकार प्रकरणी उद्या ​निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 09:10 AM2018-04-04T09:10:01+5:302018-04-04T14:46:53+5:30

सुमारे १९ वर्षे जुन्या काळवीट शिकार प्रकरणातील कांकाणी प्रकरणात उद्या ५ एप्रिलला जोधपूरच्या एका न्यायालयाचा एक  मोठा निकाल येणार ...

Salman Khan's 'jail' 'Bell'? In the case of clove hunting case, tomorrow | सलमान खानला ‘जेल’ की ‘बेल’? काळवीट शिकार प्रकरणी उद्या ​निकाल

सलमान खानला ‘जेल’ की ‘बेल’? काळवीट शिकार प्रकरणी उद्या ​निकाल

googlenewsNext
मारे १९ वर्षे जुन्या काळवीट शिकार प्रकरणातील कांकाणी प्रकरणात उद्या ५ एप्रिलला जोधपूरच्या एका न्यायालयाचा एक  मोठा निकाल येणार आहे. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याला ‘जेल’ होणार की ‘बेल’ हे उद्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट होणार आहे. 
गत १९ वर्षांपासून मुख्य न्याय दंडाधिकारी (जोधपूर ग्रामीण) न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. यापूर्वीच्या अंतिम सुनावणीत न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी आपला निर्णय उद्या ५ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता.
या प्रकरणात सलमान खानशिवाय अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हेही सहआरोपी आहे. उद्याच्या सुनावणीदरम्यान व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने या सर्वांना दिले आहे. परिणामी  हे सर्व स्टार जोधपूरकडे रवाना झाले आहेत. अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान हे तिघेही आज जोधपूरला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर दिसले. या प्रकरणाबाबत छेडले असता सर्वांनी बोलण्यास नकार दिला. 



तर तीन दिवस राहावे लागेल तुरुंगात...
जाणकारांच्या मते, उद्या सलमानच्या विरोधात निर्णय आला आणि त्याला ३ वर्षांची शिक्षा सुनावली गेली तर त्याला त्याचक्षणी जामिन मिळू शकतो. पण पाच वर्षांची शिक्षा ठोठावली गेल्यास त्याला किमान १ दिवसांसाठी तरी तुरुंगात राहावे लागेल. १ दिवसानंतर शनिवार आणि रविवार आहे. त्यामुळे अशास्थितीत सलमानला तीन रात्री जेलमध्ये काढाव्या लागू शकतात.

अशी आहेत प्रकरणे
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७व२८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. यानंतर १ आॅक्टोबर रोजी कांकणी गावात काळवीटांची शिकार केल्याचाही आरोप आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमानविरोधात एकूण चार गुन्हे (कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस प्रकरण, भवाद प्रकरण, आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरण)दाखल झाले होते. यापैकी तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा आर्म्स अ‍ॅक्टचा होता. उद्या निकाल सुनावला जाणार असलेले प्रकरण कांकाणी गावातील आहे. 
  घोडा फार्म हाऊसप्रकरणी १० एप्रिल २००६ रोजी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. पण उच्च न्यायालयाने याप्रकरणी त्याला निर्दोष ठरवले होते. राज्य सरकारने या निर्णयाविरोधा सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. भवाद गाव प्रकरणात कनिष्ठ न्यालयाने १७ फेबु्रवारी २००६ रोजी सलमानला एक वर्षांची शिक्षा 
सुनावली होती. पण उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयालाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १८ जानेवारी २०१७ रोजी आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणातही  सलमान निर्दोष सुटला आहे. पण या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
 

Web Title: Salman Khan's 'jail' 'Bell'? In the case of clove hunting case, tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.