अशी गेली सलमान खानची निकालापूर्वीची रात्र! रात्रभर स्वीमिंग पूलाच्या काठावर राहिला बसून!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 04:49 AM2018-04-05T04:49:13+5:302018-04-05T10:19:13+5:30
थोड्याच वेळात काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल येणार आहे. सलमान खानसाठी हा निकाल निर्णायक असणार आहे. सलमानला शिक्षा होणार की ...
थ ड्याच वेळात काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल येणार आहे. सलमान खानसाठी हा निकाल निर्णायक असणार आहे. सलमानला शिक्षा होणार की तो निर्दोष सुटणार, हे आजच्या निकालाने स्पष्ट होणार आहे. निकाल सुनावला जाईल तेव्हा सलमान जोधपूरच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहणार आहे. काल रात्रीच एका चार्टड विमानाने सलमान जोधपूरला पोहोचला. निकालाच्या आधल्या दिवशीची रात्र सलमानला अस्वस्थ करणारी ठरली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान जोधपूरच्या ताज पॅलेस हॉटेलच्या खोली क्रमांक ११ मध्ये थांबलेला आहे. त्याच्यासोबत त्याच्या दोन्ही बहीणी अर्पिता व अलविला तसेच त्यांची मुले आहेत. काल रात्री हे सगळे जण ताज हॉटेलच्या स्वीमिंग पुलाच्या काठावर बसलेले दिसले. रात्री १२ वाजता सलमान जिममध्ये गेला. येथून रात्री १ वाजता परतला. यानंतर त्याने स्वीमिंग पुलमध्ये स्विमींग केले. यानंतर बराच वेळ तो याठिकाणी बसून राहिला. यावेळी त्याच्या चेह-यावरची अस्वस्थता सर्वांनीच हेरली. सगळे कुटुंब झोपायला गेले. पण सलमान एकटाच पुलाकाठी बसलेला राहिला. पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत तो एकटात जागा दिसला. यानंतर त्याला त्याच्या खोलीत जाताना पाहिले गेले.
सन १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे असे सगळे घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७व२८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. यानंतर १ आॅक्टोबर रोजी कांकणी गावात काळवीटांची शिकार केल्याचाही आरोप आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमानविरोधात एकूण चार गुन्हे (कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस प्रकरण, भवाद प्रकरण, आर्म्स अॅक्ट प्रकरण)दाखल झाले होते. यापैकी तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा आर्म्स अॅक्टचा होता. आज निकाल सुनावला जाणार असलेले प्रकरण कांकाणी गावातील आहे.