सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:34 AM2018-08-28T09:34:30+5:302018-08-28T09:35:43+5:30

माल्टा येथे सलमान खानच्या ‘भारत’चे शूटींग जोरात सुरू आहे. या सेटवरचे एकापेक्षा एक सुंदर फोटो समोर येत आहेत. साहजिकचं हे फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

salman khans mother salma khan embraces katrina kaif in malta with a warm hug | सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!!

सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!!

googlenewsNext

माल्टा येथे सलमान खानच्या ‘भारत’चे शूटींग जोरात सुरू आहे. या सेटवरचे एकापेक्षा एक सुंदर फोटो समोर येत आहेत. साहजिकचं हे फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अलीकडे ईदच्या मुहूर्तावर सलमानने कॅटरिना कैफसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. या फोटोने इंटरनेट जगतात धूम केली होती. आता ‘भारत’च्या सेटवरचा आणखी असाच एक फोटो समोर आला आहे.

होय, हा फोटो सलमानची बहीण अर्पिता खानने शेअर केला आहे. या फोटोत सलमानची आई सलमा खान वधूच्या वेशात असलेल्या कॅटरिनाना प्रेमाने अलिंगण देताना दिसत आहेत. सलमा खान आणि कॅटरिनाची या फोटोतील बॉन्डिंग पाहण्यासारखी आहे. अर्पिताने हा फोटो शेअर करायची देर की, चाहत्यांनी एकापेक्षा एक प्रतिक्रिया देणे सुरू केले. काहींनी तर ‘सासू-सुनेची जोडी’ अशाही कमेंट दिल्या. या कमेंट बघून कदाचित अर्पिता खानला आपली चूक उमगली आणि तिने लगेच हा फोटो डिलिट केला. अर्थात तोपर्यंत तो व्हायरल झाला होता.
माल्टा येथे सलमानसोबत आई सलमा खान आणि बहीण अलविरा खान दोघीही गेल्या आहेत. याठिकाणी सलमान आईसोबत क्वालिटी टाईम घालवतांना दिसतोय. आईसोबतचे अनेक व्हिडिओ सलमानने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या चित्रपटात सलमानसोबत  दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन भारत हा चित्रपट बनवण्यात आला आहे.   'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: salman khans mother salma khan embraces katrina kaif in malta with a warm hug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.