अट्टल गुन्हेगारांच्या यादीत सलमान खानचे नाव; या वेबसाइटवर आहे संपूर्ण कुंडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 04:36 PM2018-04-13T16:36:23+5:302018-04-13T22:08:55+5:30
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात केली होती. त्यानंतर त्याच्या ...
क ळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात केली होती. त्यानंतर त्याच्या वकिलांना त्याचा जामीन मिळविण्यात यश आले. सध्या सलमान जामिनावर बाहेर आला आहे. सलमानला गेल्या ५ एप्रिल रोजी जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरविले होते, तर त्याच्यासोबत या गुन्ह्यात असलेले संशयित सहआरोपी तब्बू, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम यांची निर्दोष मुक्तता केली होती. (वेबसाइट लिंकसाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरोने त्यांच्या संकेतस्थळावर गुन्हेगारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये अभिनेता सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे. गुन्हेगारांच्या या यादीत सलमानला सर्वात शेवटचे म्हणजेच ३९ वे स्थान दिले आहे. ही यादी सध्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. या यादीत त्या गुन्हेगारांची नावे आहेत, जे वन्यजिवांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. ज्यामध्ये वाघांची शिकार करणाºया गुन्हेगारांचाही समावेश आहे.
दरम्यान, सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणी सेशन कोर्टातून जामीन मिळविला होता. त्यानंतर तो थेट मुंबईला रवाना झाला. सलमान खान जेव्हा जोधपूरमधील मध्यवर्ती कारागृहात होता, तेव्हा त्याला भेटण्यासाठी अभिनेत्री प्रीती झिंटा जोधपूरला आली होती. तिने कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली होती. वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरो भारत सरकारच्या वन तथा पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित आहे. यांचा उद्देश देशभरात वन्यजिवांशी संबंधित गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे होय. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे, तर दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, जबलपूर याठिकाणी त्यांची प्रादेशिक कार्यालये आहेत.