झी सिनेमावर प्रेक्षकांना या दिवशी पाहायला मिळणार सलमान खानचा पार्टनर आणि रजनिकांत यांचा रोबोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 10:26 AM2018-04-19T10:26:53+5:302018-04-19T16:06:25+5:30

​‘ब्लॉकबस्टर चित्रपटांची वाहिनी’ असलेल्या ‘झी सिनेमा’ने ‘सिनेमा प्रीमिअर लीग’अंतर्गत आपल्या ‘चॅम्पियन फिल्में हर दिन’ या वचनानुसार येत्या वीकेण्डला दोन ...

Salman Khan's partner and Rajnikanth's robot will be seen on the Zee cinemas this day | झी सिनेमावर प्रेक्षकांना या दिवशी पाहायला मिळणार सलमान खानचा पार्टनर आणि रजनिकांत यांचा रोबोट

झी सिनेमावर प्रेक्षकांना या दिवशी पाहायला मिळणार सलमान खानचा पार्टनर आणि रजनिकांत यांचा रोबोट

googlenewsNext
ब्लॉकबस्टर चित्रपटांची वाहिनी’ असलेल्या ‘झी सिनेमा’ने ‘सिनेमा प्रीमिअर लीग’अंतर्गत आपल्या ‘चॅम्पियन फिल्में हर दिन’ या वचनानुसार येत्या वीकेण्डला दोन रंजक चित्रपटांचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वीकेण्डला ही लढत अधिकच अटीतटीची आणि रंजकही होणार आहे. कारण चित्रपटसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार्स आपल्या चित्रपटांद्वारे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ‘कॉमेडी चॅलेंजर्स’ या संघातर्फे गोविंदाचा ‘पार्टनर’ हा चित्रपट शनिवार, २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता, तर ‘अॅक्शन वॉरिअर्स’तर्फे रविवार, २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याचा गाजलेला ‘रोबोट’ या चित्रपटांचे प्रसारण होणार आहे.
पार्टनर चित्रपटात गोविंदा, सलमान खान, कॅटरिना कैफ आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सामान्य माणसापेक्षा महिलांबाबत आपल्याला अधिक कळते, अशी प्रेमची (सलमान खान) समजूत असते. त्याला सहा बहिणी असतात, त्यामुळे त्यांच्याबरोबर लहानाचा मोठा होत असताना त्याला मुलींच्या मानसिकतेची अधिक विस्ताराने माहिती होते. त्यामुळे इतर पुरुषांना त्यांच्या आवडीच्या मुलीला त्यांच्या प्रेमात पाडण्यासाठी तो विविध शकली सुचवितो आणि या कामालाच तो आपला व्यवसाय बनवितो. आता त्याचे नवे अशील भास्कर (गोविंदा) हा आपली श्रीमंत आणि सुंदर बॉस प्रिया (कॅटरिना कैफ) हिच्या प्रेमात पडतो. भास्करला सल्ला देता देता तो नैना (लारा दत्ता) हिच्या प्रेमात पडतो. नैना ही एक पत्रकार असते आणि प्रेमच्या कौशल्याबद्दल तिला शंका असते. पण लोकांना प्रेमात पडण्याचे सल्ले देणारा लव्ह गुरू असल्याची त्याची खरी ओळख तिला पटल्यावर एकच गोंधळ माजतो.
रोबोट या चित्रपटात डॉ.वसी (रजनीकांत) या शास्त्रज्ञाची कथा पाहायला मिळाली होती. त्याने चित्ती नावाचा एक अतिहुशार यंत्रमानव बनविलेला असतो. एआयआरडी या यंत्रमानवविषयक सर्वोच्च संस्थेने या यंत्रमानवाला (जो दिसण्यात डॉ. वसी यांची हुबेहूब प्रतिमा असतो) मान्यता द्यावी, अशी डॉ. वसी यांची इच्छा असते, पण ती संस्था त्याची विनंती फेटाळून लावते, तेव्हा डॉ. वसी मनातून संतप्त होतो. चित्तीमध्ये मानवी भावभावना नसून त्याला न्याय्य निर्णय घेता येत नाहीत, असे या संस्थेचे मत बनते. परंतु एका वीजेच्या लोळामुळे चित्तीमध्ये मानवी भावभावना निर्माण होतात. पण तो डॉ. वसी यांची प्रेयसी सना (ऐश्वर्या राय) हिच्याच प्रेमात पडतो आणि तिच्यापासून डॉ. वसी यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. डॉ. वसी यांचा काटा काढून सनाच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करण्यात चित्ती यशस्वी होतो का? हे हाच चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेल.
हाआता या दोन संघांमध्ये तुम्ही कोणत्या संघाच्या बाजूचे आहात- ‘कॉमेडी चॅलेंजर्स’ की ‘अॅक्शन वॉरिअर्स’? हे तुम्हालाच तुमचे ठरवायचे आहे. 

Also Read : सलमान खान पुन्हा कोर्टात! मिळाली विदेशात जाण्याची परवानगी!!

Web Title: Salman Khan's partner and Rajnikanth's robot will be seen on the Zee cinemas this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.