‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवरून भाईजान सलमान खानचा फोटो झाला लीक !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 01:05 PM2017-08-19T13:05:12+5:302017-08-19T18:35:12+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या अबूधाबी येथे त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हंै’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दररोज सेटवरून त्याचा कुठला ...

Salman Khan's photo taken from the set of 'Tiger Jinda Hai' leaked! | ‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवरून भाईजान सलमान खानचा फोटो झाला लीक !

‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवरून भाईजान सलमान खानचा फोटो झाला लीक !

googlenewsNext
लिवूडचा दबंग सलमान खान सध्या अबूधाबी येथे त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हंै’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दररोज सेटवरून त्याचा कुठला ना कुठला फोटो लीक होत आहे. मात्र यावेळेस सलमानचा जो फोटो लीक झाला त्यामध्ये तो खूपच रिलॅक्स आणि खूश दिसत आहे. त्याच्या चेहºयावरील स्माइल बघून हे स्पष्ट होत आहे की, तो त्याच्या या चित्रपटामुळे खूश आहे. फोटोमध्ये तो को-स्टार नवाब शाह याच्यासोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत कुठल्या तरी विषयांवरून गप्पा मारत असावेत असे दिसत आहे. त्याचबरोबर भाईच्या गळ्यात तोच स्कार्प दिसत आहे, जो त्याने ‘एक था टायगर’प्रसंगी घातला होता. फोटोमध्ये सलमान खूपच फिट दिसत आहे. 

दरम्यान, सलमान लवकरच त्याच्या या शूटिंगमधून छोटासा ब्रेक घेऊन मुंबईत परतणार आहे. कारण दरवर्षीप्रमाणे तो याही त्याच्या घरी गणेश चतुर्थी सेलिब्रेशन केले जाणार आहे. डीएनएला मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षीदेखील सलमानच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे तो दुबई, अबुधाबी येथे सुरू असलेल्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन मुंबईत परतणार आहे. दरवर्षी सलमानच्या घरी गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जात असते. यावर्षीदेखील हा जल्लोष बघावयास मिळणार आहे. 



सलमान आणि कॅटच्या या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास चिपटाचे हे अखेरचे शेड्यूल आहे. ज्यामध्ये ‘टायगर जिंदा हैं’ची संपूर्ण टीम अथकप्रयत्न करीत असताना दिसत आहे. ४० दिवसांच्या या शेड्यूलमध्ये क्लायमॅक्स सीन शूट केला जात आहे. या अगोदर या चित्रपटाची शूटिंग आॅस्ट्रिया, मोरक्को आणि मुंबई येथे करण्यात आली आहे. अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘एक था टायगर’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल पाच वर्षांनंतर कॅटरिना आणि सलमानची जोडी पडद्यावर बघावयास मिळणार आहे. 

या चित्रपटानंतर सलमान छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त ‘बिग बॉस’शोमध्ये व्यस्त होणार आहे. ‘बिग बॉस’चा हा अकरावा सीजन असून, यावेळेसदेखील सलमान त्यास होस्ट करताना दिसणार आहे. त्याचबरोबर तो लवकरच रेमो डिसूजाच्या ‘डान्सर डॅड’ या चित्रपटासाठी डान्स प्रॅक्टिस सुरू करणार आहे. सध्या सलमान प्रचंड व्यस्त असून, तो अनेक प्रोजेक्टवर काम करीत आहे. 

Web Title: Salman Khan's photo taken from the set of 'Tiger Jinda Hai' leaked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.