'कोण विवेक ओबेरॉय?' ऐश्वर्याच्या x boyfriend ला ओळखण्यास सलमानचा नकार; म्हणाला, 'मी कोणत्याही..'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:06 AM2024-04-16T10:06:31+5:302024-04-16T10:07:02+5:30
Salman khan: ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपला विवेक जबाबदार असल्याचं सलमान समजतो. यावरुन त्यांच्यात मोठा वादही झाला होता.
बॉलिवूडमध्येसलमान खान(salman khan) -ऐश्वर्या राय (aishwarya rai) आणि अमिताभ बच्चन-रेखा (rekha) या दोन जोड्यांचं अफेअर प्रचंड चर्चेत राहिलं. यात खासकरुन ऐश्वर्या आणि सलमान यांचं नातं विविध कारणांमुळे चर्चेत आलं. आजही या जोडीची सोशल मीडियावर चर्चा होते. ऐश्वर्या आणि सलमान यांच्या ब्रेकअपमागे अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. यात विवेक ओबेरॉयमुळे या जोडीचं नातं संपुष्टात आल्याचंही सांगितलं जातं. सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासमोर विवेकचं नाव घेतल्यानंतर त्याने थक्क करणारी प्रतिक्रिया दिली होती.
सध्या सोशल मीडियावर सलमान खानची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी त्याला विवेक ओबेरॉयविषयी प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून सलमानने विवेकला ओळखण्यास नकार दिला.
‘तू विवेक ओबेरॉय याला कधीच माफ करणार नाही.. बरोबर?…’ यावर सलमान म्हणतो, ‘कोण विवेक ओबेरॉय?’ असं म्हणत सलमानने त्याला ओळखण्यास नकार दिला. त्यावर त्याला आणखी एक प्रश्न विचारला. ‘तुला विवेक तुझ्या आयुष्यात नकोच नाही, त्याच्यासोबत तुझे काहीही संबंध नाहीत?’ यावर सलमान म्हणतो, ‘कोण विवेक मी ओळखत नाही…’ असं म्हणत सलमानने त्याच्याविषयी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला.
दरम्यान, विवेक ओबेरॉय ऐश्वर्याच्या आयुष्यात आल्यामुळे सलमान आणि तिचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं. सलमान आणि विवेकमध्ये मोठा वादही झाला होता. या सगळ्याचा परिणाम विवेकच्या करिअरवरही झाला. तर, या घटनेनंतर सलमान-ऐश्वर्या विभक्त झाले. सलमान आजही सिंगल आहे. तर, ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आहे. तिला ११ वर्षांची आराध्या ही मुलगीदेखील आहे.