2025 Upcoming Movies: २०२५ मध्ये 'हे' २० धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, यादीच वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:04 IST2025-01-20T17:04:00+5:302025-01-20T17:04:12+5:30

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. Salman Khan’s Sikandar To Rajinikanth’s Coolie Tops The List Of Imdb’s Most Anticipated Movies Of 2025 See Full List Here

Salman Khan’s Sikandar To Rajinikanth’s Coolie Tops The List Of Imdb’s Most Anticipated Movies Of 2025 See Full List Here | 2025 Upcoming Movies: २०२५ मध्ये 'हे' २० धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, यादीच वाचा

2025 Upcoming Movies: २०२५ मध्ये 'हे' २० धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, यादीच वाचा

2025 Upcoming Movies: नववर्ष 2025 चित्रपट प्रेमींसाठी खास आसणार आहे. अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे.  अभिनेता सलमान खान, आमिर खान, विकी कौशल, रश्मिका मंदाना, यश, सनी देओल, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी यांसारख्या दिग्गजांचे चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. असे एक दोन नाही तर थेट २० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सर्वच चित्रपटांची देशभरात मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट (List of Upcoming films of 2025 )येणार आहेत.


IMDb नुसार 2025  सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी:

1.    सिकंदर
2.    टॉक्सिक
3.    कूली
4.    हाऊसफुल 5
5.    बाग़ी 4
6.    राजा साब
7.    वॉर 2
8.    L2: एंपुरान
9.    देवा
10.    छावा
11.    कन्नप्पा
12.    रेट्रो
13.    ठग लाईफ
14.    जाट
15.    स्काय फोर्स
16.    सितारे जमीन पर
17.    थामा
18.    कंतारा ए लीजंड: चॅपटर 1
19.    अल्फा
20.    थांडेल

रश्मिका मंदान्ना ही एकमेव अभिनेत्री ठरली आहे, जिचे मुख्य भुमिका असलेले तिन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सलमान खानसोबत 'सिकंदर' (Sikandar),  विकी कौशलसोबत  'छावा' (Chhaava ) आणि आयुषमान खुराणासोबत थामा (Thama ) या सिनेमात रश्मिका झळकणार आहे. याबद्दल रश्मिकानं आनंद व्यक्त केला आहे. 

 रश्मिका म्हणाली, "माझे ३ आगामी चित्रपट IMDb च्या २०२५ मधील सर्वाधिक अपेक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत पाहून मला खूप छान वाटतंय. २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा २' जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता २०२५ मध्ये तिन सिनेमे येत आहेत. हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि त्यांच्या मनाला भावणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याचे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे, आणि हेच मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देते. माझ्या चाहत्यांचे आणि या चित्रपटांच्या टीममधील प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानते, ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं".

Web Title: Salman Khan’s Sikandar To Rajinikanth’s Coolie Tops The List Of Imdb’s Most Anticipated Movies Of 2025 See Full List Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.