भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:29 PM2021-06-08T17:29:39+5:302021-06-08T17:30:18+5:30

सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी चित्रपट टायगर ३ला खूप मोठा फटका बसला आहे

Salman Khan's 'Tiger 3' set was destroyed, the bus was hit by crores | भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका

भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका

googlenewsNext

बॉलिवूडचा भाईजान उर्फ अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी चित्रपट टायगर ३ला खूप मोठा फटका बसला आहे. या सिनेमासाठी सर्व टीमने खूप मेहनत घेतली होती. मात्र ही मेहनत वाया गेली आहे. टायगर ३ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होण्याआधीच सेटचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे निर्मात्यांना देखील मोठा तोटा झाला आहे. लॉकडाऊन पूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सेट उभारण्यात आला होता. पण कोरोना व्हायरसचा वाढता थैमान पाहाता चित्रीकरण बंद करण्यात आले.


सलमान खानचा सुपरहिट ठरलेला चित्रपट टायगर अभी जिंदा है या चित्रपटाचा सीक्वल टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमात सलमान सोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे. दरम्यान ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, 'टायगर ३' चित्रपटाचा सेट दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. दुसऱ्यांदा सेट तयार करण्यासाठी तब्बल अडीचशे ते तिनशे कामगारांची मदत लागली. पण लॉकडाऊनमुळे सेटचा उपयोग झाला नाही. मुंबईत पावसाने देखील जोर धरला आणि 'टायगर ३' चित्रपटाचा सेट उध्वस्त झाला.


टायगर ३ चित्रपटात कतरीना कैफ आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता इमरान हाश्मी निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.

 
सलमान खानचा राधे योर मोस्ट वॉण्डेट भाई सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट कोरोनाच्या संकटामुळे भारतात थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.

Web Title: Salman Khan's 'Tiger 3' set was destroyed, the bus was hit by crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.