सलमान खानच्या आयुष्यात यांना आहे सगळ्यात जास्त महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:59 PM2018-10-22T15:59:30+5:302018-10-22T16:01:49+5:30
सलमानच्या आयुष्यात त्याच्या पाळीव प्राण्यांना प्रचंड महत्त्व आहे. तो त्याच्या पाळीव कुत्र्यांवर प्रचंड प्रेम करतो. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वेळ घालवतो, त्यांच्यासोबत खेळतो, मस्ती करतो, एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबतच झोपतो.
सलमान खानच्या आयुष्यात त्याच्या कुटंबाला आणि त्याच्या घरातील पाळीव प्राण्यांना प्रचंड महत्त्व आहे. तो त्याच्या पाळीव कुत्र्यांवर प्रचंड प्रेम करतो. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वेळ घालवतो, त्यांच्यासोबत खेळतो, मस्ती करतो, एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबतच झोपतो. सलमान त्याच्या चित्रीकरणाच्या स्थळी देखील अनेकवेळा त्याच्या पाळीव प्राण्यांना घेऊन जातो. इंडियाज गॉट टायलेंट या कार्यक्रमात त्याने त्याच्या पाळीव प्राण्यांसोबत हजेरी लावली होती. त्याच्या घरातील कुत्र्यांना तो त्याची मुलेच समजतो. त्यांना पाळीव प्राणी अथवा कुत्रा असे संबोधलेले त्याला आवडत नाही. त्याच्या माय लव्ह या कुत्र्याचे नुकतेच निधन झाले. तो सलमानच्या परिवारातील एका सदस्याप्रमाणेच होता.
माय लव्हच्या आधी माय जान, वीर आणि माय सन असे कुत्रे त्याच्याकडे होते. यांच्यावर सलमान प्रचंड प्रेम करायचा. माय जान आणि माय सनचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. माय सनचे 2009 मध्ये निधन झाल्यानंतर माय जान सतत आजारी पडत होता आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सलमानला चांगलाच धक्का बसला होता. त्यानंतर सलमानने आणखी काही कुत्रे घरी आणले आणि त्यांचे पालनपोषण केले. सलमान त्याच्या या पाळीव प्राण्यांकडून खूप काही शिकला असल्याच्या त्याच्या मुलाखतींमध्ये आवर्जून सांगतो. त्याच्या या पाळीव प्राण्यांनी त्याला संयम आणि क्षमा या दोन्ही गोष्टी शिकवल्या असल्याचे त्याचे मत आहे.
प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याच्या वीर या कुत्र्याचे निधन झाले. या कुत्र्याचे त्याने काही फोटो पूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये सलमानचे लकी ब्रेसलेट आपल्याला वीरच्या हातात पाहायला मिळाले होते. बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याच्या एका पाळीव प्राण्याची तब्येत खराब झाल्याने तो चित्रीकरण सोडून देखील घरी आला होता. यावरूनच त्याच्या आयुष्यात त्याच्या या पाळीव प्राण्यांना किती महत्त्व आहे हे दिसून येते.