सलमान खानच्या आगामी चित्रपटात झाली तब्बूची एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 05:59 AM2018-05-22T05:59:01+5:302018-05-22T11:29:01+5:30
सलमान खानच्या आगामी चित्रपट 'भारत' कोणत्याना कोणत्या गोष्टीला घेऊन चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात दिशा पटानीची एंट्री झाली ...
स मान खानच्या आगामी चित्रपट 'भारत' कोणत्याना कोणत्या गोष्टीला घेऊन चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात दिशा पटानीची एंट्री झाली आहे. आता नव्या रिपोर्टनुसार यात सलमान खानची मैत्रिण तब्बूची सुद्धा एंट्री झाली आहे. सध्या तब्बू यात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतचा दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाला, मी तब्बूचा खूप मोठा फॅन आहे आणि मला नेहमीच तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मी खूप खूश आहे की तब्बू भारत चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे. मी शूटिंग सुरु होण्याची वाट बघतोय.
ALSO READ : सलमानच्या 'त्या' Kiss ने पालटले योगिताचे नशीब, आता करणार हे काम!
सलमान आणि तब्बू पहिल्यांदा 1996 साली आलेल्या जीत चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर ते डेविड धवन यांच्या 'बीवी नं 1' चित्रपटात एकत्र होते. 2014 मध्ये आलेल्या 'जय हो'मध्ये सुद्धा त्यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट प्रियांका चोप्राला कास्ट करण्यात आले आहे. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. सर्वातआधी 2004मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान व प्रियांका एकत्र दिसले होते. यानंतर ‘सलाम ए इश्क’ आणि ‘गॉड तुस्सी गे्रट हो’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. या चित्रपटाचे शूटिंग दिल्ली, पंजाब, अबु धाबी आणि स्पेनमध्ये होणार आहे. भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे.