Bharat Movie: माल्टानंतर 'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'भारत'चे चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:14 PM2018-09-24T16:14:15+5:302018-09-24T16:15:07+5:30
Bharat Movie: बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'भारत'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'भारत'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे माल्टा येथील शुटिंग पूर्ण झाले आहे. आता या चित्रपटाचे पुढचे शुटिंग करण्यासाठी एक खास ठिकाण निवडण्यात आले आहे.
'भारत' चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर हे ट्विटरवरुन 'भारत' चित्रपटाचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. त्यांनीच आता या चित्रपटाचे पुढचे ठिकाण कोणते असणार, याची माहिती दिली आहे. 'माल्टा' या सुंदर ठिकाणी या चित्रपटाचा बराचसा भाग शुट करण्यात आला, आता 'अबू धाबी' येथे या चित्रपटाचे पुढील शुटिंग करण्यात येणार आहे. 'अबू धाबी'तील काही ठिकाणांचे फोटो अली अब्बास जाफरने त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत.
All set for Abu Dhabi , next destination Team @Bharat_TheFilm ... pic.twitter.com/6oIH2JZeDU
— ali abbas zafar (@aliabbaszafar) September 23, 2018
अली अब्बास जाफरचा 'भारत' हा सलमानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापुर्वी त्यांचे 'सुलतान' व 'टायगर जिंदा है' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. 'भारत' या चित्रपटात कतरिना शिवाय तब्बू आणि दिशा पटानी या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जूनला प्रदर्शित होईल.