​ ‘ट्युबलाईट’च्या क्लायमॅक्सवरून सलमान का पेटला हट्टाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2016 01:40 PM2016-11-21T13:40:26+5:302016-11-21T13:40:26+5:30

सलमान खान म्हणजे दिग्दर्शक कबीर खान याचा हुकमी शिक्का. कबीरच्या ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान काम करतोय. पण अलीकडे दोघांमध्ये जरा बिनसल्याची ...

Salman kicks off the 'Tweblight' climax? | ​ ‘ट्युबलाईट’च्या क्लायमॅक्सवरून सलमान का पेटला हट्टाला?

​ ‘ट्युबलाईट’च्या क्लायमॅक्सवरून सलमान का पेटला हट्टाला?

googlenewsNext
मान खान म्हणजे दिग्दर्शक कबीर खान याचा हुकमी शिक्का. कबीरच्या ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान काम करतोय. पण अलीकडे दोघांमध्ये जरा बिनसल्याची चर्चा आहे. अर्थात यामुळे ‘ट्युबलाईट’चे शूटींग थांबले नाहीच. आता ‘ट्युबलाईट’च्या सेटवरून नवी खबर आलीय. होय, ‘ट्युबलाईट’चा क्लायमॅक्स म्हणे सलमानला फारसा आवडलेला नाही. त्यामुळेच त्याने म्हणे, यात बदल सुचवले आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स नव्याने शूट व्हावा, अशी सलमानची इच्छा आहे. यावरून कबीर व सलमान खान यांच्यात मतभेद झाल्याचीही खबर आहे. कबीरने या मुव्हीचा क्लायमॅक्स नव्याने शूट करावा, अशी सलमानची इच्छा आहे. विशेष म्हणजे सलमान सध्या बिझी आहे. बिझी शेड्यूलमुळे त्याला पुन्हा मनालीत जाऊन शूट करणे शक्य नाही. त्यामुळे कबीरने मुंबईत मनालीचा सेट बनवावा, असे त्याचे म्हणणे आहे. कबीरला हे सगळ अशक्य वाटतयं. पण सलमान कुणाचेच ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीय. या मतभेदांतून कसा मार्ग काढला जातो, हे तूर्तास तरी ठाऊक नाही. त्यामुळेच ‘ट्युबलाईट’चा क्लायमॅक्स रिशूट होतो की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
मध्यंतरी सलमानच्या एका वाईट सवयीमुळे कबीर खान भडकल्याची खबर आली होती. सलमान चित्रीकरण संपल्यानंतर टीमसोबत पार्टी करत बसतो. सलमान तर काही तासांत या पार्टीमधून निघून जातो. पण उर्वरित टीम रात्र-रात्रभर पार्टी करते. यामुळे दुसºया दिवशीचे शेड्यूल बिघडते. या सलमानच्या सवयीमुळे कबीर संतापला होता. यातूनच दोघांमध्ये तू- तू-में-मैं झाली होती.
सलमानच्या या चित्रपटात चीनी अभिनेत्री झू झू सुद्धा दिसणार आहे. इतकेच नाही तर सलमानचा लहान भाऊ सोहेल खान याचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. सलमान यात चित्रपटाद्वारे प्रथमच एका चीनी अ‍ॅक्ट्रेससोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Web Title: Salman kicks off the 'Tweblight' climax?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.