सलमान, शाहरूख, दीपिकासह लहानपणी असे दिसायचे तुमचे फेव्हरेट स्टार्स, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:40 AM2017-11-14T11:40:53+5:302017-11-14T17:12:55+5:30
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (चाचा नेहरू) यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू ...
स वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (चाचा नेहरू) यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू यांना लहान मुले खूप आवडायचे. त्यामुळेच त्यांना चाचा नेहरू या नावाने ओळखले जात होते. असो, आज देशभर बाल दिन साजरा केला जात असून, बॉलिवूडमधील सुपरस्टार लहानपणी कसे दिसायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर या सुपरस्टार्सनी लहानपणीच्या त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या असून, त्यांच्याच शब्दात आम्ही त्या मांडल्या आहेत.
सलमान खान
आम्ही लहानपणी सर्वच भाऊ-बहीण खूप खोडकर होतो. आम्ही असे काही कारनामे करीत होतो, ज्यामुळे माझे वडील खूपच वैतागून जायचे. अशात आम्ही पकडलो गेलो तर वडिलांच्या रोषाचा सामना मलाच करावा लागत असे. कारण त्यावेळी अरबाज पळून जायचा आणि सोहेल लहान असल्याने त्याला कोणी फारसे बोलत नसे. मला आठवतेय की, जेव्हा आम्ही घरात असलेली जुनी भांडी आणि ट्राफी विकण्यासाठी गेलो होतो. मात्र जेव्हा ही बाब पापाला माहिती झाली तेव्हा त्यांनी आमची चांगलीच धुलाई गेली.
शाहरूख खान
मी माझे लहानपण एन्जॉय करू शकलो नाही. कारण लहानपणीच मी पोरका झालो होतो. मात्र जेवढे काही आठवते त्यामध्ये मला पार्लेजीच्या चॉकलेट्सची आजही आठवण येते. कारण जेव्हा माझा बर्थ डे असायचा तेव्हा मी पार्लेजीचे चॉकलेट्स शाळेत घेऊन जात होतो. त्याचबरोबर मला हेदेखील आठवते की, माझे वडील खूप स्मार्ट होते. जेव्हा ते बाहेर पडायचे तेव्हा लोक वळून त्यांच्याकडे बघत होते. माझी आई माझ्यातील खोडकरपणा बघून खूश व्हायची. मला आठवतेय की, माझा पापाने मला सांगितले होते, जर संधी मिळाली तर काश्मीर बघायला नक्की जा. कारण ते आपल्या देशातील जन्नत आहे.
शाहिद कपूर
लहानपणीची गोष्टच निराळी असते. मला आठवतेय की, मी माझ्या क्यूट लूक्समुळे टीचर्सचा फेव्हरेट होतो. मी लहानपणी खूप गोलू-मोलू होतो. त्यामुळे प्रत्येकजण माझे गाल ओढत असे. आज जेव्हा मी माझ्या मुलीकडे बघतो तेव्हा मला लहानपणीचीच आठवण येते.
अक्षयकुमार
लहानपणी मी प्रचंड खोडकर होतो. माझे वडील माझ्यावर प्रचंड प्रेम करायचे, परंतु मी त्याचा फायदा घ्यायचो. लहानपणी खूप मस्ती केली. मला आठवतेय की, लहानपणी मी अमिताभजी यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला अमितजींचा आॅटोग्राफ घेऊन येण्यास सांगितले. जेव्हा मी अमितजींकडे गेलो तेव्हा ते द्राक्ष खात होते. अमितजींनी मला आॅटोग्राफ तर दिलाच शिवाय द्राक्षही खाण्यास दिले.
दीपिका पादुकोण
लहानपणी मी खूपच लाजाळू होते. आमच्या घरी जेव्हा एखादा पाहुणा येत असे तेव्हा मी माझ्या आईच्या पाठीमागे लपायची. मला एखाद्या अनोळख्या व्यक्तीला हॅलो म्हणतानाही भीती वाटायची. त्यावेळी मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, मी एक अभिनेत्री बनणार.
सोनाक्षी सिन्हा
लहानपणी मी एकदम राउडी राठोड होती. शाळेत तर मी दादा होती. माझ्याशी कोणीही पंगा घेत नसे. त्याचबरोबर मी खूपच लॉयलही होती. जर कोणी माझ्या मित्रांना त्रास देत असेल तर ते मी अजिबातच सहन करीत नसे.
श्रद्धा कपूर
लहानपणापासूनच मी सगळ्यांची फेव्हरेट होती. त्यामुळेच मला माझ्या टीचर्सपासून सगळ्यांचेच प्रेम मिळाले. मला डान्सची खूप हौस होती. त्यामुळे पार्टीत मी डान्स करण्यासाठी सगळ्यात पुढे राहायची. माझ्या डान्समुळे मला बरेचसे गिफ्टही मिळत असत.