​कैदी नंबर १०६ बनून सलमानने अशी काढली तुरुंगातील पहिली रात्र.. !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 04:37 AM2018-04-06T04:37:50+5:302018-04-06T11:38:32+5:30

सुमारे दोन दशके जुन्या काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याने ...

Salman took the prisoner number 106 to be the first night in the jail! | ​कैदी नंबर १०६ बनून सलमानने अशी काढली तुरुंगातील पहिली रात्र.. !

​कैदी नंबर १०६ बनून सलमानने अशी काढली तुरुंगातील पहिली रात्र.. !

googlenewsNext
मारे दोन दशके जुन्या काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याने कालची पहिली रात्र तुरूंगात काढली. सलमानला जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले. त्याची ही बराक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या शेजारीच असल्याचे कळते. तुरंगात रवानगी होताच सलमानला कैदी नंबर १०६ ही ओळख मिळाली.  कालची अख्खी रात्र सलमानने अस्वस्थेत काढली.  तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री त्याने जेवणही केले नाही.  रात्री त्याना वरण-भात, कोबीची भाजी आणि चपाती दिली गेली. मात्र त्याने जेवणास नकार दिला. रात्री १२ वाजेपर्यंत सलमान त्याच्या बराकीबाहेर टेहळत होता.  यानंतर तो झोपायला बराकीत गेला. आज सकाळी ६.३० वाजता सलमान उठला. उठल्यावर त्याला सकाळची न्याहारी देण्यात आली. पण त्याला ती आवडली नाही. मग त्याने तुरुंगातील कॅन्टिनमधून स्वत:साठी ब्रेड  आणि दूध मागवले. सलमानच्या कुटुंबानी कालच या कॅन्टिनमध्ये ४०० रूपये जमा केले होते. जेणे करून सलमान त्याच्या आवडीच्या वस्तू येथून घेऊ शकेल. तुरुंगातील कपडे घालण्यास सलमानने नकार दिला. कालच्याच कपड्यात त्याने अख्खी रात्र काढली.
काल कोठडीत आल्यानंतर सलमानची आरोग्य तपासणी केली असता त्याचा रक्तदाब वाढला होता. मात्र काही तासात तो सामान्य झाला.

ALSO READ : सलमान खानविषयी या गोष्टी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

 

Web Title: Salman took the prisoner number 106 to be the first night in the jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.