सलमानच्या हिरॉईनची अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पोस्ट, म्हणाली - 'धर्मनिरपेक्ष भारत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:06 AM2024-01-24T11:06:38+5:302024-01-24T11:09:30+5:30

अभिनेत्री रेवतीने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर आपलं मत व्यक्त केलं.

Salman's Heroine revathy Posts On Ayodhya Prana Pratishta Ceremony talk about Secular India | सलमानच्या हिरॉईनची अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पोस्ट, म्हणाली - 'धर्मनिरपेक्ष भारत...'

सलमानच्या हिरॉईनची अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पोस्ट, म्हणाली - 'धर्मनिरपेक्ष भारत...'

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (22 जानेवारी ) संपन्न झाला आहे. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशासाठी ऐतिहासिक क्षण होता. या सोहळ्यात देशातील अनेक मोठे नेते, संत, बॉलिवूडसेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाले होते. हा सोहळा केवळ अयोध्येपुरता मर्यादित राहिला नाही, तर देशाच्या इतर अनेक भागातही साजरा करण्यात आला. त्याचबरोबर जे अयोध्येला पोहोचू शकले नाहीत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. 

आता अभिनेत्री रेवतीने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर आपलं मत व्यक्त केलं.  रेवतीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहलं, "जय श्री राम. कालचा दिवस अविस्मरणीय होता!!! रामाचा मोहक चेहरा पाहिल्यानंतर आनंद झाला. माझ्यामध्ये असाही एक भाग आहे हे मलाच माहिती नव्हतं. हिंदू म्हणून जन्माला आल्यावर आपण आपली श्रद्धा आपल्यापुरतीच ठेवतो, इतरांच्या श्रद्धा दुखावण्याचा प्रयत्न करत नाही. फार देखावा करत नाही'.

पुढे त्यांनी लिहलं, 'भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे आपण धार्मिक श्रद्धा खाजगी ठेवतो. प्रत्येकासाठी हे असेच असले पाहिजे. श्री रामच्या आगमनानंतर खरोखरच अनेक गोष्टी बदलल्या आहेत...कदाचित पहिल्यांदाच 'आस्तिक' आहोत हे आपण ठणकावून सांगितल आहे!!!जय श्री राम". त्याच्या या पोस्टनं अनेकाचं लक्ष वेधून घेतलं. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रेवती या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीत आहेत.  सलमान आणि रेवती हे १९९० च्या ‘लव्ह’या चित्रपटात एकत्र झळकले होते.  नुकतचं सलमानच्या 'टायगर 3' सिनेमात दोघांनी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर केली. सलमान आणि रेवती यांची जोडी 30 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. गिरीश कर्नाड हे सलमान खानच्या 'टायगर' चित्रपटाच्या दोन भागांमध्ये रॉ चीफच्या भूमिकेत दिसले होते. अभिनेता गिरीश यांचे 2019 मध्ये निधन झाले. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री रेवती या चित्रपटात रॉ चीफची भूमिका साकारताना दिसली.

Web Title: Salman's Heroine revathy Posts On Ayodhya Prana Pratishta Ceremony talk about Secular India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.