न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही सलमानच्या ‘ट्यूबलाईट’चा प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 06:08 AM2017-06-16T06:08:23+5:302017-06-16T12:48:38+5:30

सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट धूम करणार, हेही ...

Salman's 'Liquid Light' at Times Square in New York | न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही सलमानच्या ‘ट्यूबलाईट’चा प्रकाश

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही सलमानच्या ‘ट्यूबलाईट’चा प्रकाश

googlenewsNext
मान खानच्या ‘ट्यूबलाईट’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट धूम करणार, हेही ठरलेले आहे. होय, केवळ भारतातच नाही तर न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ‘ट्यूबलाईट’चे पोस्टर्स लागले आहेत. ‘ट्यूबलाईट’च्या निमित्ताने जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर प्रथमच एका बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर्स झळकत आहेत. एकंदर काय तर, चित्रपट निर्मात्यांनी व ओवरसीज डिस्ट्रिब्यूटर्स म्हणजेच यशराज फिल्म्सने ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाहीये, हेच यावरून दिसते आहे.



‘ट्यूबलाईट’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंट टाईम्सवर स्क्वेअरचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एका गगनचुंबी इमारतीवर ट्युबलाइचा पोस्टर पाहायला मिळत असून, तो गर्दीच्या आणि दर्शनीय भागातच लावण्यात आला आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  



‘ट्यूबलाईट’ची कथा 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. हॉलिवूड चित्रपट ‘लिटिल बॉय’चा   रिमेक आहे. मात्र तरीही दिग्दर्शक कबीर खानने या चित्रपटात बरेच बदल केले आहेत. चायनीज कलाकार झू झू हिचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.  
कबीर खान आणि सलमान खान या जोडीचा ‘ट्यूबलाईट’ हा तिसरा चित्रपट आहे. याआधी ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘एक था टायगर’ सारखे हिट चित्रपट या जोडीने बॉलिवूडला दिले आहेत. प्रेक्षकांना या ही वेळेला दोघांकडून एक सुपरहिट चित्रपटाची अपेक्षा आहे. सध्या सलमान खान  त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ चे शूटिंग करतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या ब्रेकअपनंतर त्यांची केमिस्ट्री पहिल्यादांच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.  

Web Title: Salman's 'Liquid Light' at Times Square in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.