सलमानच्या लग्न न करण्याचं कारण समोर; मेहुणा आयुष शर्माने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:27 AM2021-11-30T11:27:44+5:302021-11-30T11:28:19+5:30

सलमान खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांचा अंतिमः द फायनल ट्रुथ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Salman's reason for not getting married; Revealed by Mehuna Ayush Sharma | सलमानच्या लग्न न करण्याचं कारण समोर; मेहुणा आयुष शर्माने केला खुलासा

सलमानच्या लग्न न करण्याचं कारण समोर; मेहुणा आयुष शर्माने केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांचा अंतिमः द फायनल ट्रुथ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदाच सलमान खान आणि त्याचा मेव्हणा आयुष शर्मा एकत्र काम करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्‍यान आयुष शर्माने सलमान खानच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. त्यावेळी आयुषला सलमान खानच्या लग्‍नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

मीडिया रिपोर्टनुसार, आयुष शर्माने सांगितले की, सलमान खान सोबत मी लग्‍नाबद्दल जास्‍त बोलत नाही. सलमान खान ज्‍या पद्धतीने आयुष्‍य जगतो आहे, काम करतो आहे, त्‍यावरून लक्षात येते की, सलमान खानकडे लग्‍नासाठी वेळ नाही. ते जसे आहेत तसेच खुश आहेत. ते याबाबतचा निर्णय स्‍वत:च घेतील.

सलमान खानला या गोष्टीत नाही अजिबात रस

आयुष शर्माला सलमान खानच्या जीवनशैलीबद्दल विचारण्यात आले. त्‍यावर सलमान खान हे अत्‍यंत साधेपणाने राहतात. जर तुम्‍ही सलमान खानचा फोन पाहिला तर ते २ ते ३ वर्षे जुना फोन वापरतात. त्‍यांना नवीन गॅजेट्स वापरण्याची अजिबात आवड नाही. सलमानला नवीन कार, कपडे यासारख्या गोष्‍टींमध्ये रस नसल्‍याचे त्‍याने सांगितले.

भाईजान खूप साध्या पद्धतीने राहतो...

आयुष शर्मा म्‍हणाला फक्‍त एकच अशी गोष्‍ट आहे जी सलमान खानला आवडते ती म्‍हणजे चित्रपट. सलमानला २ ते ३ तासांसाठी एकटे सोडले तर तो आपला वेळ चित्रपट पाहण्यात घालवतो. या पूर्वी एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी सलमान खान एकटा असताना खूप साध्या पध्दतीने राहतो. आता त्‍याने लग्‍न करायला हवे अशी रिअॅक्शन दिली होती.

Web Title: Salman's reason for not getting married; Revealed by Mehuna Ayush Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.