“देवाची कृपा की आमचा घटस्फोट झाला...”, सामंथा- नागा चैतन्यच्या घटस्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:30 PM2023-03-14T15:30:24+5:302023-03-14T15:30:47+5:30
Samantha Ruth Prabhu and Naga Chaintanya : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली होती. अगदी हा घटस्फोट का झाला इथपासून घटस्फोटानंतरच्या पोटगीपर्यंतच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अद्यापही ही चर्चा थांबलेली नाही.
Samantha Ruth Prabhu and Naga Chaintanya : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही साऊथची लोकप्रिय जोडी होती. दोघं प्रेमात पडले आणि यानंतर दोघांचं थाटामाटात लग्न पार पडलं होतं. मात्र लग्नाला उणीपुरी चार वर्षे होत नाही तोच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. दोघांच्या घटस्फोटाला वर्षभराहून अधिक काळ झाला आहे. या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली होती. अगदी हा घटस्फोट का झाला इथपासून घटस्फोटानंतरच्या पोटगीपर्यंतच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अद्यापही ही चर्चा थांबलेली नाही. आता या घटस्फोटाबद्दल वेगळीच माहिती समोर येतेय. होय, चित्रपट समीक्षक उमेर संधूने सामंथा व नागाच्या घटस्फोटाबद्दल एक शॉकिंग खुलासा केला आहे.
BREAKING NEWS : As per #SamanthaRuthPrabhu, #NagaChaitanya abused her badly. He was the Worst Husband ever. I suffered alot mentally & physically torture. I was even Pregnant but i did abortion. Thank god, I divorced & moved on. pic.twitter.com/7ybQYB93PZ
— Umair Sandhu (@UmairSandu) March 12, 2023
उमेर संधू या घटस्फोटाबद्दल एक ट्विट केलं आहे. 'समंथाच्या म्हणण्यानुसार, नागा चैतन्यने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. तो खूप वाईट नवरा आहे. मला प्रचंड मानसिक छळ व शारिरीक छळ सहन करावा लागला. मी गरोदर होते पण मी गर्भपात केला. देवाचे आभार की मी घटस्फोट घेतला आणि त्याच्यापासून विभक्त झाले', अशा आशयाचं हे ट्विट आहे. सध्या हे ट्विट चांगलंच व्हायरल होतंय. या ट्विटमध्ये किती सत्यता आहे, ते ठाऊक नाही. कारण अद्याप तरी सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यापैकी कुणीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सामंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न केवळ चार वर्षे टिकू शकलं. दोघांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, विभक्त झाल्याची घोषणा केली होती. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. 40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं.