Samantha Ruth Prabhu : “सामंथाचं करिअर संपलंय, आता ती ड्रामा करतेय...”, प्रोड्यूसर चिट्टी बाबूचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:10 AM2023-04-18T11:10:08+5:302023-04-18T11:18:16+5:30
Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभु ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री. गेल्या काही महिन्यांपासून सामंथा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अलीकडच्या काळात सामंथा अनेक अडचणींचा सामना करतेय.
सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu ) ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री. तिची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. पण आता एका निर्मात्याने सामंथाचं करिअर संपल्याचा दावा केला आहे. सामंथाचं करिअर संपलंय. आता तिच्या करिअरमध्ये काहीही उरलेलं नाही, असा दावा या निर्मात्याने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सामंथा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अलीकडच्या काळात सामंथा अनेक अडचणींचा सामना करतेय. सर्वप्रथम तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं. नागा चैतन्यसोबत तिचा घटस्फोट झाला. यातून सावरू शकत नाही तोच तिला मायोसिटिस या आजाराने ग्रासलं. यामुळे तिला काही काळ ॲक्टिंगपासून दूर राहावं लागलं. पण याऊपरही सिनेमात काम करतेय. नुकताच तिचा 'शाकुंतलम' हा सिनेमा रिलीज झाला. मात्र यादरम्यान साऊथचे दिग्गज दिग्दर्शक व निर्माते Tripuraneni Chittibabu यांनी सामंथाबद्दल शॉकिंग खुलासा केला आहे.
Each drop of your cry will brings you joy with full of success.
— SamanthaRuthPrabhu (@worldofSamantha) November 8, 2022
You already won the battle girl
Always inspirational for many reasons.
Hope one day you will become normal & happy @Samanthaprabhu2#Samantharuthprabhu𓃵pic.twitter.com/tSo4QsYIAk
'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत त्रिपुरनेनी चिट्टी बाबू यांनी सामंथाच्या करिअरबद्दल काही धक्कादायक गोष्टी बोलून दाखवल्या. सामंथा ज्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन करतेय, ते पाहून त्यांनी काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
Samantha goes emotional when Dir Gunasekhar is talking #SamanthaRuthPrabhu#Samantha#ShaakuntalamTrailerpic.twitter.com/P8w0bxqkbs
— Filmy Buff (@filmibuff23) January 9, 2023
काय म्हणाले चिट्टी बाबू
'शाकुंतलम'च्या प्रमोशनदरम्यान सामंथा भावुक झाली होती. ती पर्सनल लाईफबद्दल बोलताना अक्षरश: रडली. याबद्दल छेडलं असता चिट्टी बाबूंनी हे सगळं नकली असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, ते सगळं नकली होतं. शंकुतला बनण्यासाठी तिला काय काय सहन करावं लागलं, हे सामंथाने रडत रडत सांगितलं. पण सगळे कलाकार तितकीच महेनत करतात. यशोदाच्या प्रमोशनवेळीही ती अशीच रडली. हे योग्य नाही. हा फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. अनेक कलाकार आपल्या भूमिकेसाठी नको इतकी मेहनत करतात. पण सामंथा या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय. याला सस्ती पब्लिसिटी म्हणतात. सामंथाचं वजन घटलंय. तिचा चेहराही बदलला आहे. ती आजारी झाली आणि आता प्रत्येक चित्रपटासाठी ड्रामा करतेय. सोशल मीडियावर तिचे रडके फोटो व्हायरल झालेत. हे सगळं पब्लिसिटीसाठी होतं. अनेक कलाकार आजारी असतानाही काम करतात. पण त्यांनी कधीच अशी सहानुभूती मिळवली नाही. सामंथाचं स्टारडम व चार्म संपला आहे. ती एक सुपरस्टार होती. पण आता तिचं करिअर संपलं आहे. त्यामुळे ती अशी सस्ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करतेय. परंतु लोक भावुक होऊन सिनेमाला गर्दी करत नसतात...
चिट्टी बाबूच्या या दाव्यांवर सामंथा कशी रिॲक्ट करते ते बघूच...