१ हजारापेक्षा कमी पैशांमध्ये समंथाने केलंय काम; एका सिनेमासाठी ३ कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची पहिली कमाई वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:53 AM2022-04-19T10:53:23+5:302022-04-19T10:53:43+5:30
Samantha ruth prabhu: गेल्या काही दिवसांपासून समंथा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. यामध्येच आता समंथाच्या पहिल्या पगाराविषयीची चर्चा रंगली आहे.
समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समंथाने तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही ती तितकीच फेमस आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. यामध्येच आता समंथाच्या पहिल्या पगाराविषयीची चर्चा रंगली आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील टॉप अॅक्ट्रेस म्हणून समंथाकडे पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंती समंथाला असते. विशेष म्हणजे समंथा एका चित्रटासाठी २ ते ३ कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे महागडी अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. मात्र, आज कोटी रुपयांमध्ये खेळणाऱ्या समंथाचं पहिलं मानधन अगदीच किरकोळ होतं. तिचं मानधन ऐकून कोणालाही तिच्यावर विश्वास बसणार नाही.
किती होती समंथाची पहिली सॅलरी?
अलिकडेच समंथाने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन ठेवलं होतं. यात चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने उत्तरं दिली. 'समंथा तुझी पहिली कमाई किती होती?' असा प्रश्न एका नेटकऱ्याने समंथाला विचारला. त्यावर समंथाने पहिल्यांदाच तिची कमाई सांगितली. 'माझी पहिली कमाई ५०० रुपये होती. हे पैसे मला कांफ्रेसदरम्यान होस्टेस होण्यापूर्वी हॉटेलकडून देण्यात आली होती', असं समंथा म्हणाली.
पुढे ती म्हणते, 'मी १० वी किंवा ११ वीमध्ये असताना काम करु लागले होते. त्यावेळी मला ८ तास काम करावं लागायचं. या कामासाठी मला ५०० रुपये पगार मिळायचा.'
दरम्यान, ५०० रुपयांपासून करिअरची सुरुवात करणारी समंथा आज कोट्यवधींची मालकीन आहे. आज समंथा एका चित्रपटासाठी २-३ कोटी रुपये चार्ज करते. समंथा लवकरच यशोदा चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १२ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.