Shaakuntalamच्या रिलीजच्या आधी बिघडली समांथाची तब्येत! अभिनेत्रीच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 01:14 PM2023-04-13T13:14:47+5:302023-04-13T13:32:54+5:30
'शकुंतलम'च्या रिलीज आधी तिची तब्येत बिघडली आहे. अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबाबत ट्विट करून चाहत्यांना काळजीत टाकलं आहे.
साऊथची सुपरस्टार समंथा रुथ पभू सध्या तिच्या आगामी 'शकुंतलम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. अभिनेत्री दररोज चित्रपटाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये स्पॉट केली जाते. चित्रपटाव्यतिरिक्त ती तिच्या तब्येतीमुळेही चर्चेत आहे. दरम्यान, तिच्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये अभिनेत्रीने तिच्या तब्येतीबद्दलचे अपडेट शेअर केले आहेत. समंथाने खुलासा केला की तिला प्रकृतीच्या कारणास्तव हैदराबादमधील एका महाविद्यालयातील प्रमोशनल इव्हेंटला ती जाऊ शकली नाही.
सामंथाने गेल्या वर्षी एका पोस्टमध्ये सांगितले होते की, ती मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त आहे. मात्र त्यानंतर लगेच तिने कामाला सुरुवात केली आणि आजकाल ती तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट शकुंतलमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबाबत ट्विट करून चाहत्यांना चितेंत टाकलं आहे.
समंथाने ट्विट करून लिहिले की, 'या आठवड्यात मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप उत्सुक होते, पण व्यस्त शेड्यूलचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला आहे आणि मला ताप आला आहे. माझा आवाज ही गेला आहे.'
(1/2)I was really excited to be amongst you all this week promoting my film and soaking in your love.
— Samantha (@Samanthaprabhu2) April 12, 2023
Unfortunately the hectic schedules and promotions have taken its toll, and I am down with a fever and have lost my voice.
समंथा रुथ प्रभू याआधी 11 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'यशोदा' चित्रपटात दिसली होती. आणि आता अभिनेत्री तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट शाकुंतलममुळे चर्चेत आहे.