Samantha Ruth Prabhu : “तर मी अडचणीत येऊ शकते...”, नागा चैतन्य सोबतच्या घटस्फोटावर बोलली सामंथा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:30 AM2023-04-11T11:30:02+5:302023-04-11T11:31:13+5:30

Samantha Ruth Prabhu On her divorce with Naga Chaitanya: ऑक्टोबर २०२१ मध्ये सामंथाने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. याकाळात तिने अनेक भावनिक आघात सोसले. आता सामंथा हळूहळू मुव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतेय...

samantha ruth prabhu not want to forget anything divorce naga chaitanya | Samantha Ruth Prabhu : “तर मी अडचणीत येऊ शकते...”, नागा चैतन्य सोबतच्या घटस्फोटावर बोलली सामंथा  

Samantha Ruth Prabhu : “तर मी अडचणीत येऊ शकते...”, नागा चैतन्य सोबतच्या घटस्फोटावर बोलली सामंथा  

googlenewsNext

Samantha On her divorce with Naga Chaitanya: साऊथ ब्युटी सामंथा रूथ प्रभुचं पर्सनल लाईफ सतत चर्चेत असतं. ऑक्टोबर २०२१ मध्ये सामंथाने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. याकाळात तिने अनेक भावनिक आघात सोसले. आता सामंथा हळूहळू मुव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतेय.  इतके दिवस घटस्फोटावर बोलणं टाळत असणारी सामंथा आताश: त्यावर बोलू लागली आहे. घटस्फोट आणि त्याआधीच्या अनेक गोष्टी विसरण्यासारख्या नाहीत आणि मला विसरायच्याही नाहीत, असं सामंथा म्हणाली.

Gulte ला दिलेल्या मुलाखतीत तिला नुकताच पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारला गेला. आयुष्यातील अशी कोणती गोष्ट कोणती आहे जी तुला कायमची विसरायची आहे, असा प्रश्न तिला केला गेला. यावर तुम्ही अप्रत्यक्षपणे माझ्या रिलेशनशिपबद्दल विचारत आहात का, असा उलट प्रश्न तिने केला. ''या प्रश्नाचं उत्तर मला अडचणीत टाकू शकतं. खरं तर मला आयुष्यात घडलेली कोणतीच गोष्ट विसरायची नाही. कारण त्या प्रत्येक गोष्टीनं मला काही ना काही शिकवलं आहे,त्यामुळे मला ठरवूनही काही विसरायचं नाही. ओ गॉड..हे मी स्पष्टपणे बोलून गेली खरी पण मला यामुळे कोणतीही अडचण येऊ नये. मी इथेच थांबते...मला या प्रश्नाचं उत्तर आणखी सविस्तर द्यायचं नाही''. असं ती म्हणाली.
 काही दिवसांपूर्वीच सामंथाने तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाविषयी मौन सोडलं होतं.  पुष्पा सिनेमात मी ओ अंटावा हे आयटम नंबर करु नये. अशी माझ्या कुटुंबाचा इच्छा होती. या गाण्यासाठी मला कुटुंबातून विरोध करण्यात आला होता, असं तिने सांगितलं होतं.

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही साऊथची लोकप्रिय जोडी होती. दोघं प्रेमात पडले आणि यानंतर दोघांचं थाटामाटात लग्न पार पडलं होतं. मात्र लग्नाला उणीपुरी चार वर्षे होत नाही तोच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. दोघांच्या घटस्फोटाला वर्षभराहून अधिक काळ झाला आहे. या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली होती. अगदी हा घटस्फोट का झाला इथपासून घटस्फोटानंतरच्या पोटगीपर्यंतच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अद्यापही ही चर्चा थांबलेली नाही.
समंथाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर शाकुंतलम हा सामंथाचा सिनेमा येत्या १४ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. त्यानंतर लवकरच सामंथा सिटाडेल या सीरिजमध्ये झळकणार आहे.

Web Title: samantha ruth prabhu not want to forget anything divorce naga chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.