उगाच सामंथाच्या या आयटम साँगची इतकी चर्चा झाली नाही..! BTS व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:16 IST2022-01-07T15:13:00+5:302022-01-07T15:16:44+5:30
Samantha Ruth Prabhu Pushpa Item Song : ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या गाण्यातील सामंथाच्या किलर मुव्ह्सने चाहत्यांना भुरळ पाडली. या डान्स मुव्ह्स करताना सामंथाला बराच घाम गाळावा लागला. होय, या गाण्याच्या रिहर्सलवेळी सामंथा अगदी रडकुंडीला आली होती.

उगाच सामंथाच्या या आयटम साँगची इतकी चर्चा झाली नाही..! BTS व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
साऊथची सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिची आता वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. साऊथपासून बॉलिवूडपर्यंत सामंथाला सगळेच ओळखतात.‘द फॅमिली मॅन 2’ या वेबसिरीजमधील सामंथाचा दमदार अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं होतं. यानंतर अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ (Pushpa ) या चित्रपटात सामंथा एका आयटम साँगवर थिरकताना दिसली. ‘उ अंतावा उ उ अंतावा’ (Oo Antava Oo Oo Antava ) या गाण्यातील सामंथाच्या किलर मूव्ह्सने चाहत्यांना भुरळ पाडली. पडद्यावर या डान्स मुव्ह्स पाहायला सोप्या वाटतात. पण त्या करताना सामंथाला बराच घाम गाळावा लागला. होय, या गाण्याच्या रिहर्सलवेळी सामंथा अगदी रडकुंडीला आली होती.
विश्वास बसत नसेल तर रिहर्सलचा हा बिहाइंड द सीन व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. सामंथाचा हा बीटीएस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात सामंथा अगदी जीव ओतून नाचताना दिसतेय.
विशेष म्हणजे डान्सच्या स्टेप्स आणि लिरिक्स हे सर्व लक्षात ठेवताना ती किती थकली आहे हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.‘यांनी मला प्रचंड थकवलं, असं सामंथा या व्हिडीओ म्हणतेय. सामंथा हे गमतीनं म्हणाली असली तरी या गाण्यासाठी तिने घेतलेली मेहनत स्पष्ट दिसतेय.
सामंथाचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. चर्चा खरी मानाल तर या काही मिनिटांच्या डान्स नंबरसाठी सामंथाने 1.5 कोटी रुपए इतके मानधन घेतलं आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती नाही.
सामंथाचा नुकताच घटस्फोट झाला. गेल्याच महिन्यात सामंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केले होतं. लग्नाच्या 4 वषार्नंतर दोघेही विभक्त झाले होते.लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे, इतकंच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची. हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना खटकत होती, असं म्हटलं जातंय.अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर सामंथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती. सामंथाला हा विरोध, ही बंधनं खटकतं होती आणि याच कारणामुळे तिने नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे. घटस्फोटानंतर लगेच सामंथाने ह्यपुष्पाह्णमध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला.