मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:17 PM2021-10-12T12:17:02+5:302021-10-12T12:20:30+5:30

सगळं काही माहित असूनही तो गप्प राहिला..., वाचा, अफेअरच्या अफवा पसरवणाऱ्यांऐवजी नागावर का भडकला प्रीतम?

samantha ruth prabhu stylist preetham jukalker breaks his silence on the rumours of dating actress after divorce with naga chaitanya | मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या महिन्यात समांथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांचे चाहते हैराण झाले होते.

साऊथचं लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu )आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतल्याची घोषणा केली आणि यानंतर या घटस्फोटाच्या कारणांची चर्चा सुरू झाली. याचदरम्यान सामंथा तिचा स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला (Preetham Jukalker)डेट करत असल्याचीही चर्चा रंगली. यामुळेच सामंथा व नागाचा घटस्फोट झाल्याचा दावा केला गेला. आता यावर स्वत: प्रीतमने खुलासा केला आहे. सामंथा व माझ्यात अजिबात अफेअर वगैरे नाही. मी तर तिला बहिण मानतो, असं त्यानं स्पष्ट केलं आहे.
 ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रीतम यावर सविस्तर बोलला. सामंथा व आपल्यात काहीही नसल्याचं त्यानं सांगितलं. पण यावेळी नागा चैतन्यला त्यानं चांगलंच सुनावलं.

काय म्हणाला प्रीतम?
सामंथा व माझं अफेअर सुरू आहे, हे निव्वळ बकवास आहे, या नुसत्या अफवा आहेत. मी तिला जीजी म्हणून हाक मारतो, हे अख्ख्या इंडस्ट्रीला माहित आहे. जीजी म्हणजे बहीण. मग आमच्यात अफेअर कसं असू शकतं? असा सवाल त्याने केला.

नागा चैतन्यला सगळं माहित आहे...
लोक काहीही बोलतात. पण मी नागा चैतन्यवर नाराज आहे. माझे व सामंथाचं नातं त्याला माहित आहे. या सगळ्या चर्चा सुरू झाल्या, तेव्हा त्याच्या एका मुलाखतीने सर्व काही थांबलं असतं. अफवा रोखता आल्या असत्या. पण तो गप्प राहिला. सगळं काही माहित असूनही तो गप्प राहिला. मी नागा चैतन्यलाही अनेक वर्षांपासून ओळखतो. माझ्यात व सामंथामध्ये तसं काहीही नाही, हे त्यालाही ठाऊक आहे. लोक निरर्थक अफवा पसरवत आहेत. नागाने एक शब्द बोलला असता तर या लोकांची तोंडं बंद झाली असती, असं प्रीतम म्हणाला.
गेल्या महिन्यात समांथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांचे चाहते हैराण झाले होते. समांथा आणि नागा चैतन्य हे 2010मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. त्या दोघांनी गोव्यात 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली होती.

Web Title: samantha ruth prabhu stylist preetham jukalker breaks his silence on the rumours of dating actress after divorce with naga chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.