Yashoda Box Office Collection: सामंथाच्या 'Yashoda'ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई, जाणून घ्या आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 03:40 PM2022-11-12T15:40:25+5:302022-11-12T16:07:22+5:30

35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या समंथा रुथ प्रभूच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जबरदस्ती कमाई केली आहे.

Samantha Ruth Prabhu Yashoda earned 3.20 cr india net on its first day for all languages | Yashoda Box Office Collection: सामंथाच्या 'Yashoda'ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई, जाणून घ्या आकडा

Yashoda Box Office Collection: सामंथाच्या 'Yashoda'ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई, जाणून घ्या आकडा

googlenewsNext

Yashoda Box Office Collection Day 1: सामंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) चा 'यशोदा'(Yashoda)  चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती आणि आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसत आहे. अ‍ॅक्शनसोबत भावनांचा सुरेख मेळ या चित्रपटात पाहायला मिळत आहे, तसेच अभिनेत्रीचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दरम्यान, चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शनही केलं आहे.

यशोदाचं ओपनिंग डे  कलेक्शन
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'यशोदा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या समंथा रुथ प्रभूच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमुळे निर्मात्यांना दिलासा मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने ओपनिंग डेटला 3.20 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी, प्री-रिलीज दरम्यानही चित्रपटाने बंपर कमाई केली होती. 'यशोदा'नं आधीच ओटीटी आणि सॅटेलाइटद्वारे 55 कोटींची कमाई केली. म्हणजेच निर्मात्यांनी या चित्रपटाची किंमत आधीच वसूल केली असून आता बॉक्स ऑफिसवर कमाई सुरु आहे. 


मायोसिटिस नावाच्या आजाराचा सामना करतेय
'यशोदा'नं 3.20 कोटी रुपयांची कमाई सर्व भाषांमध्ये आहे. आता निर्मात्यांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांच्या नजरा शनिवार-रविवारच्या कलेक्शनवर खिळल्या आहेत. या दोन दिवसांतही चित्रपटाची कमाई चांगली झाली, तर 'यशोदा'ला हिट होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. मायोसिटिस आजाराने ती ग्रस्त आहे. त्यामुळे तिला ‘यशोदा’चं प्रमोशन  करता आलेले नाही. ती क्वचितच दोन-तीन कार्यक्रमांमध्ये दिसली.

'यशोदा'(Yashoda)चे दिग्दर्शन हरीश नारायण आणि के. हरिशंकर यांच्या जोडीने केली आहे. 'यशोदा' व्यतिरिक्त समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या 'शाकुंतलम' आणि 'कुशी' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. शकुंतलम हा कालिदासाच्या प्रसिद्ध नाटक शकुंतलावर आधारित पीरियड ड्रामा चित्रपट आहे.
 

Web Title: Samantha Ruth Prabhu Yashoda earned 3.20 cr india net on its first day for all languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.