समय रैनाला मोठा झटका! गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द; कॉमेडीयनचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:04 IST2025-02-13T10:03:21+5:302025-02-13T10:04:07+5:30

समय रैनाला मोठा फटका पडलाय हे दिसत असून त्याचे गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द झाल्याची माहिती समोर येतेय (samay raina)

samay raina all upcoming show in gujrat cancelled indias got latent controversy | समय रैनाला मोठा झटका! गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द; कॉमेडीयनचं मोठं नुकसान

समय रैनाला मोठा झटका! गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द; कॉमेडीयनचं मोठं नुकसान

कॉमेडीयन समय रैना (samay raina) सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'इंडियाज गॉट लेटन्ट'शो (indias got latent) मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (ranveer allahabadia) अश्लील कमेंट केल्याने समय रैना आणि रणवीरवर चांगलीच कारवाई करण्यात आली. जगभरातील तमाम सेलिब्रिटी आणि सामान्य माणसांकडून याप्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. समयने काल त्याच्या युट्यूबवरुन  'इंडियाज गॉट लेटन्ट'चे सर्व एपिसोड डीलीट केले. अशातच समयला आणखी एक मोठा फटका बसलाय. गुजरातमध्ये होणारे समयचे आगामी सर्व शो रद्द करण्यात आले आहेत.

समयचे गुजरातमधील सर्व शो रद्द

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, विश्व हिंदू परिषदेने बुधवारी सांगितलं की, 'इंडियाज गॉट लेटन्ट' शोमध्ये अश्लील कमेंट केल्यामुळे लोकांमध्ये असलेल्या तीव्र नाराजीला गृहीत धरुन समय रैनाचे गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. 'समय रैना अनफिल्टर्ड' हा त्याचा शो गुजरातमध्ये होणार होता. त्याचे तिकीट बूक माय शो वर उपलब्ध होते. परंतु आता हे तिकीट बुक माय शोवर दिसत नाहीत. त्यामुळेच गुजरातमधील समयचे सर्व शो रद्द करण्यात आले असल्याचं दिसतंय.

१७ एप्रिलला सूरतमध्ये, १८ एप्रिलला वडोदरा, 19 आणि 20 एप्रिलला अहमदाबादमध्ये दोन शो होणार होते. परंतु हे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. जशी तिकीट विक्री सुरु झाली तसं यापैकी काही शो हाऊसफुल्लही झाले. परंतु आता बुक माय शोने या शोचं बुकींग रद्द केलंय. यामुळे समयचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.  'इंडियाज गॉट लेटन्ट'मध्ये अश्लीलतेचा प्रसार केल्याने समय रैनाला आगामी काळात मोठा फटका बसणार आहे.

समयने सर्व व्हिडीओ केले डीलीट

दरम्यान समयने काल इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहिलं की, "हे सर्व घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हेच माझे ध्येय होते. मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे होईल. धन्यवाद,"

 

Web Title: samay raina all upcoming show in gujrat cancelled indias got latent controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.