आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 04:44 PM2023-05-19T16:44:03+5:302023-05-19T16:47:03+5:30

Sameer Wankhede : समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

sameer wankhede whatsapp chat reveals bollywood becoming source to expand drugs racket aryan khan and other stars are being brand ambassadors of such rave parties | आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

googlenewsNext

पुन्हा एकदा आर्यन खान (Aryan Khan) प्रकरण चर्चेत आले आहे. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप चॅट्स हे समीर वानखेडे आणि तत्कालीन एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्यासोबत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये कॉर्डेलिया क्रूजवर समीर वानखेडेंच्या टीमने छापा टाकल्यानंतरच्या घडामोडींदरम्यानचे या दोघांमधील संभाषण आहे. त्यानुसार, आर्यन खान याला या क्रूज पार्टीसाठी तब्बल २७ लाखांची व्हीव्हीआयपी तिकीटे देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्रूज पार्टीचे प्रमोशन करण्यासाठी आर्यन खान आणि त्याच्या आठ मित्रांना ही तिकिटं देण्यात आल्याचा दावा या चॅटमध्ये करण्यात आला आहे.

आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळाले...

या चॅटमध्ये समीर वानखेडे ज्ञानेश्वर सिंह यांना सांगत आहेत की, या सगळ्यात बॉलिवूड महत्त्वाची भूमिका बजावते. कारण ड्रग्जचे व्यसन पसरवण्यासाठी आणि जास्तीत जास्त ग्राहक जमवण्यासाठी, ड्रग्जची विक्री करण्यासाठी बॉलिवूडमधील लोकांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून वापर केला जातो. त्यामुळेच आर्यन खानला मोफत तिकिटं, मुली आणि ड्रग्ज मिळाले. कुणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नावाचा रेव्ह पार्टीची तिकिटं विकण्यासाठी वापर करू शकत नाही.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचा कशा प्रकारे वापर केला जातो
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचा कशा प्रकारे वापर केला जातो, यासंदर्भात या चॅटमध्ये दावे करण्यात आले आहेत. त्यात म्हटलंय की, अनेक बॉलिवूड स्टार्स या व्यवहाराचा हिस्सा आहेत. ते शहराच्या बाहेर किंवा रिसॉर्ट्समध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करतात. तिथे मोफत ड्रग्ज पुरवतात. त्यात बॉलिवूड स्टार्सला आमंत्रित केले जाते. म्हणजे या पार्टीचे आणखी प्रमोशन होते. त्यानंतर एकदा का ड्रग्जचं व्यसन लागले, की त्यांचे ग्राहक वाढतच जातात. सेक्स हा घटक असे व्यसन लावण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्याामुळे ते या पार्ट्यांमध्ये एमडीएमए आणि काही मुलींनादेखील बोलवतात.

Web Title: sameer wankhede whatsapp chat reveals bollywood becoming source to expand drugs racket aryan khan and other stars are being brand ambassadors of such rave parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.