पत्नीला घाबरवण्याच्या नादात अभिनेत्यानं गमावला जीव, संपत जे रामच्या जवळच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:08 PM2023-04-25T19:08:00+5:302023-04-25T22:00:11+5:30

संपत जे रामच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

Sampath j ram co actor rajesh dhruva reveals actor tried to hang himself as a prank to threaten his wife | पत्नीला घाबरवण्याच्या नादात अभिनेत्यानं गमावला जीव, संपत जे रामच्या जवळच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

पत्नीला घाबरवण्याच्या नादात अभिनेत्यानं गमावला जीव, संपत जे रामच्या जवळच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

googlenewsNext

कन्नडचा लोकप्रिय स्टार संपत जे. (Sampat J)चे २२ एप्रिलला निधन झालं.  संपत ने नेलमंगला येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. मात्र आता या घटनेत नवा ट्विस्ट आला आहे. अभिनेत्याच्या मित्राने उघड केले की संपत आपल्या पत्नीला घाबरवण्यासाठी प्रॉंक करत होता, परंतु प्रत्यक्षात त्याला आपला जीव गमवावा लागला.

संपत जे रामच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कन्नड मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली . वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याने हे जग सोडले यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. दिवंगत अभिनेत्याची पत्नी 5 महिन्यांची गर्भवती आहे.

संपत जे रामचा जवळचा मित्र आणि को-स्टार राजेश ध्रुवने आता असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राजेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, संपतचे रात्री पत्नीसोबत किरकोळ वाद झाले. यानंतर तो केवळ पत्नीला घाबरवण्यासाठी फासावर लटकवण्याचा प्रकार करत होता, मात्र दुर्दैवाने यादरम्यान त्याला आपला जीव गमवावा लागला.

संपत जे रामने राजेश ध्रुवसोबत टीव्ही सीरियल अग्निसाक्षीने करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय दोन्ही स्टार्सनी श्री बालाजी फोटो स्टुडिओ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.  संपत जे रामवर अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी एनआर पुरा येथे करण्यात आला आहे. याप्रकरणी बंगळुरू पोलीस तपास करत आहेत.
 

Web Title: Sampath j ram co actor rajesh dhruva reveals actor tried to hang himself as a prank to threaten his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.