Samrat Prithviraj : ‘सम्राट पृथ्वीराज’ का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले, मुळात सनी देओलसाठी लिहिली होती कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 03:16 PM2022-06-17T15:16:22+5:302022-06-17T15:23:03+5:30

Samrat Prithviraj : अक्षयचा हा सिनेमा इतका दणकून आपटेल, असा कुणी विचारही केला नव्हता. चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandra Prakash Dwivedi) यांनी या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी आयुष्याची 18 वर्ष दिलीत. पण बॉक्स ऑफिसवर 18 दिवसही हा सिनेमा टिकला नाही...

samrath prithviraj director chandraprakash dwivedi talk on prithviraj got flop | Samrat Prithviraj : ‘सम्राट पृथ्वीराज’ का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले, मुळात सनी देओलसाठी लिहिली होती कथा

Samrat Prithviraj : ‘सम्राट पृथ्वीराज’ का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले, मुळात सनी देओलसाठी लिहिली होती कथा

googlenewsNext

 Samrat Prithviraj Flop Reason: अक्षय कुमारच्या  (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’  (Samrat Prithviraj) या सिनेमाची रिलीजआधी जोरदार चर्चा होती. प्रत्यक्षात रिलीज झाल्यावर हा सिनेमा दणकून आपटला. 200 कोटींवर खर्च करून बनवलेल्या सिनेमाचा बजेटही वसूल झाला नाही. 12 दिवसांत या चित्रपटाने केवळ 65.32 कोटींची कमाई केली. अक्षयचा हा सिनेमा इतका दणकून आपटेल, बॉक्स ऑफिसवर त्याची अशी गत होईल, असा कुणी विचारही केला नव्हता. अगदी अक्षय कुमार आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandra Prakash Dwivedi) यांनीही असा विचार केला नव्हता.

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी आयुष्याची 18 वर्ष दिलीत. पण बॉक्स ऑफिसवर 18 दिवसही हा सिनेमा टिकला नाही. द्विवेदी यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलचं दु:ख बोलून दाखवलं. ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप होण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.

सनी देओलसाठी लिहिली होती स्टोरी...
‘सम्राट पृथ्वीराज’ची कथा सनी देओलला डोळ्यांसमोर ठेवूनन लिहिली होती, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, या सिनेमाची कथा मी सनी देओलसाठीच लिहिली होती. 18 वर्षांपूर्वी मी स्वत: हा सिनेमा प्रोड्यूस करणार होतो. पण तेव्हा मला मार्केटमधून सपोर्ट मिळाला नाही, असं ते म्हणाले.

का फ्लॉप झाला सिनेमा...
‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमा फ्लॉप का झाला, मला माहित नाही. पण या सिनेमाला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यात आलं. हे याच्या फ्लॉप होण्यामागचं सर्वात मोठ कारण आहे. इतिहास संशोधकांनी या चित्रपटावर वा कथेवर प्रश्न उपस्थित केले असते तर मी समजू शकलो असतो. मला त्याचा आनंदही झाला असता. पण सरसकट या चित्रपटाला नाकारलं जाणं, माझ्या मते गैर आहे. इतिहास अशा पद्धतीने काम करत नसतो. कदाचित आम्ही लोकांचा मूड समजू शकलो नाही, हेही एक कारण असावं. आम्ही हा सिनेमा मोठ्या स्केलवर बनवला. पण लोक त्याच्याशी कनेक्ट करू शकले नाहीत. पण का? हे मात्र मी अद्यापही समजू शकलेलो नाही. लेखकांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं. आम्ही ऐतिहासिक तथ्यांशी अजिबात छेडछाड केली नाही. आम्ही आमची जबाबदारी जाणतो, असं ते म्हणाले.

जाणकार म्हणतात...
‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप होण्यामाग  अनेक कारणं सांगितली जात आहेत. ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नहाटा यांच्या मते, ऐतिहासिक सिनेमांची कमाई हा नेहमीच चिंतेचा विषय ठरत आला आहे. आजची पिढी अशा सिनेमांशी स्वत:ला रिलेट करू शकत नाही. अक्षय कुमार या चित्रपटात लीड रोलमध्ये होता. पण ही भूमिका साकारताना पडद्यावर त्याचा फारसा इंटरेस्ट दिसला नाही. चित्रपटाच्या संगीतानेही निराशा केली. शिवाय या चित्रपटाचं प्रमोशन देशभक्तीच्या अंदाजात केलं गेलं. प्रत्यक्षात चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना तसं काहीच दिसलं नाही.

Web Title: samrath prithviraj director chandraprakash dwivedi talk on prithviraj got flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.