Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:09 IST2023-07-05T18:08:26+5:302023-07-05T18:09:40+5:30
Sana Khan : अभिनेत्री सना खान हिने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते आणि आता तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
अभिनेत्री सना खान (Sana Khan) हिने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते आणि आता तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. तिला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. ही माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे. तिच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
अभिनेत्री सना खान हिने इंस्टाग्रामवर 'अल्लाहने आम्हाला मुलगा दिला', असं म्हणत तिनं पोस्ट शेअर केली आहे. जशी ही खुशखबर मिळाली तशी तिच्या चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सना खानने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितले होते. त्यानंतर तिने तिच्या बाळाबाबत खूप उत्सुक असल्याचे म्हटले होते. प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर ती रमजानदरम्यान बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत देखील दिसली होती.
सना खान एकेकाळी मनोरंजन जगतातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा होता. तिने मालिका, चित्रपट आणि ओटीटी अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपटात केमिओ व्यतिरिक्त स्पेशल ऑप्समध्ये तिने केलेली भूमिका लोकप्रिय ठरली होती. परंतु २०२०मध्ये तिने अचानक सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
त्यानंतर २०२० मध्ये लॉकडाउननंतर तिने फोटो शेअर करत खुलासा केली की, तिने अनस सयैदसोबत निकाह केला आहे. त्यानंतर अनेकांना या वृत्तावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. तिच्या नवऱ्याला देखील यावरून ट्रोल केले होते. बऱ्याच कालावधीनंतर सना खानने स्वतः खुलासा केला की, शेवटी तिने इंडस्ट्री का सोडली. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मागार्चे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते.