'सनम तेरी कसम' च्या सीक्वेलची घोषणा, हर्षवर्धन राणे मुख्य भूमिका झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 03:03 PM2024-09-10T15:03:28+5:302024-09-10T15:04:33+5:30

'सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे.

Sanam Teri Kasam sequel announced Harshvardhan Rane in a lead role | 'सनम तेरी कसम' च्या सीक्वेलची घोषणा, हर्षवर्धन राणे मुख्य भूमिका झळकणार

'सनम तेरी कसम' च्या सीक्वेलची घोषणा, हर्षवर्धन राणे मुख्य भूमिका झळकणार

२०१६ साली आलेला रोमँटिक हिंदी सिनेमा 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि मावरा होकेन यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली. दरम्यान सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेन्मेंटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'सनम तेरी कसम २' बाबत पोस्ट करण्यात आली आहे.

'सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे. सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगला बिझनेस केला. तसंच प्रेक्षकांच्या मनात कायम घर केलं. सिनेमातील गाणीही आजही लोकांच्या ओठांवर आहेत. आता निर्माते आणि मेकर्सने ८ वर्षांनी सिनेमाचा सीक्वेल येत असल्याची गुडन्यूज दिली. यामध्ये हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बाकी स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


तसंच सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 'सनम तेरी कसम' पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे. ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. आता सीक्वेलच्या घोषणेने तर उत्सुकता आणखी वाढली आहे. हर्षवर्धन राणेने सिनेमात 'इंदर'ची आणि मावरा होकेनने 'सुरु' ही भूमिका साकारली. सिनेमात शेवटी सुरुचा मृत्यू होतो तर इंदर एक यशस्वी वकील बनतो. आता सिनेमात पुढे काय कहाणी असणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: Sanam Teri Kasam sequel announced Harshvardhan Rane in a lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.