'या' कारणामुळे नाकारला कृति सॅननने रोहित शेट्टीचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 12:21 PM2017-07-14T12:21:22+5:302017-07-14T17:51:22+5:30

त्यानंतर तब्बल 7 वर्षांनंतर रोहित शेट्टी 'गोलमाल4' हा चित्रपट घेऊन येतो आहे. अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे. अर्शद ...

Sanan has denied Rohit Shetty's film | 'या' कारणामुळे नाकारला कृति सॅननने रोहित शेट्टीचा चित्रपट

'या' कारणामुळे नाकारला कृति सॅननने रोहित शेट्टीचा चित्रपट

googlenewsNext
यानंतर तब्बल 7 वर्षांनंतर रोहित शेट्टी 'गोलमाल4' हा चित्रपट घेऊन येतो आहे. अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे. अर्शद वारसी आणि कुणाल खेमू यांच्यासह यावेळी परिणीती चोप्रा आणि तब्बू ही झळकणार आहे. रोहित शेट्टी सध्या 'गोलमाल4' चित्रपटावर काम करतोय यानंतर तो रणवीर सिंगला घेऊन आगामी चित्रपटाचे काम सुरु करणार आहे. 'गोलमाल4' नंतर रोहित आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टसवर काम करणार आहे. तो नुकताच परदेशातून परत आला आहे आणि त्यांने आगामी चित्रपटासंदर्भात रणवीर सिंगच्या अपोझिट रोलसाठी काही अभिनेत्रींशी बोलणं सुरु केले आहे. कृति सॅनन ही या पैकी एक आहे ज्याच्याशी रोहित या रोलबाबत बोलला आहे. मात्र कृतिला या चित्रपटाची पटकथा फारशी आवडली नसल्याने तिने नकार दिला आहे. सुशांत सिंग राजपूत सोबत आलेल्या तिचा राब्ता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला यानंतर कृति चित्रपटाचा विषय निवडताना चांगलीच अर्लट झाल्याचे समजते आहे. 

रणवीर सिंगला घेऊन रोहित शेट्टी जो चित्रपट तयार करणार आहे तो साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. साऊथच्या या मुळाच्या  चित्रपटात काजल अग्रवाल होती. कृती सेननने नकार दिल्यानंतर या चित्रपटात काजल अग्रवालला साईन करण्यात येणार असल्याते समजते आहे. मात्र याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही. काजलने याआधी ही रोहित शेट्टीसोबत काम केले आहे. अजय देवगणच्या सिंघम या चित्रपटात त्याच्यासोबत काजल अग्रवाल झळकली होती. साऊथच्या अनेक  चित्रपटात तिने काम केले आहे. यमला पगला दीवाना3मध्ये ही तिची वर्णी लागल्याचे समजते आहे मात्र यात ती कोणासोबत रोमांस करणार हे अद्याप कळलेले नाही.             

Web Title: Sanan has denied Rohit Shetty's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.