कन्नड अभिनेत्री रागिणीच्या अडचणीत वाढ, फार्म हाऊस पार्टीत ड्रग्स घेतल्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 08:07 PM2020-09-10T20:07:19+5:302020-09-10T20:16:38+5:30
अमलीपदार्थांच्या सेवनासाठी मोठमोठ्या पार्ट्यांचा आयोजन केलं जायचं.
बेंगळुरु पोलिसांनी सैंडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणी सेंट्रल काईम ब्राँचने कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीच्या विरोधात ACMM कोर्टात रिमांडसाठी अर्ज दाखल केला आहे. पोलिसांच्या रिमांड कॉपीनुसार रागिणी आणि प्रशांत रांकाचा मित्र रविशंकरकडून चॅट रेकॉर्ड व अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
रंका आणि रविशंकरवर ड्रग्स घेतल्याचा आणि ते मोठ्या पार्ट्यांमध्ये पुरवण्याचा आरोप आहे. 16 जून 2019ला रविशंकरने आपल्या नंबरवरुन नायजेरियाच्या ड्रग पेडलरला मेसेज करुन म्हणाला होता की, चांगल्या स्टफची व्यवस्था कर. दुसऱ्या एक मेसेजमध्ये तो म्हणाला होता की, 2 जी सेलिब्रिटी स्टफची आवश्कता आहे. 12 एप्रिल 2020 ला रविशंकरने आणखी एक मेसेज पेडलरला केला होता, त्या तो म्हणाला, मला 1 ग्रॅमपेक्षा कमी उपलब्ध आहे.
फार्म हाऊसवर झाली होती ड्रग्स पार्टी
आजतकच्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या एका मेसेजमध्ये तो म्हणतो की, सध्या मोठा ट्रॅकिंग चालू आहे, संदीप पाटील सर. रागिणी द्विवेदी, राहुल, विरेन खन्ना, प्रशांंत रंंका आणि रविशंकर फार्म हाऊसवर पार्टी करायचे हे देखील रिमांड अर्जात नमूद करण्यात आले आहे. या फॉर्म हाऊस पार्टीत अशा कॉन्सर्ट व्हायच्या ज्यात ड्रग्ज घेतले जायचे.
विरेन खन्ना आयोजक
अमलीपदार्थांच्या सेवनासाठी मोठमोठ्या पार्ट्यांचा मुख्य आयोजक विरेन खन्ना आहे. तो दिल्लीत होता. त्याला अटक करण्यासाठी सीसीबीचे दोन पोलीस निरीक्षक दिल्लीला गेले होते. रविशंकरला के.के. शंकर या नावेही ओळखले जाते. तो मार्ग परिवहन कार्यालयात कारकून आहे.
रागिणीचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला असून २००९ मध्ये तिने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. केम्पे गोवडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा या चित्रपटांमधील भूमिकांमुळे ती प्रकाशझोतात आली. रागिनीने काही दिवसांपूर्वीच ड्रग्सबद्दल ट्विट केलं होतं.
ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे?