सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर संदीप नाहर झाला होता अस्वस्थ, झाला खळबळजनक खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 08:10 PM2021-02-17T20:10:10+5:302021-02-17T20:12:32+5:30

एम.एस. धोनी या चित्रपटात संदीपने सुशांत सिंग रजपूतच्या मित्राची भूमिका साकारली होती.

Sandeep Nahar Was Affected by Sushant Singh Rajput's Death | सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर संदीप नाहर झाला होता अस्वस्थ, झाला खळबळजनक खुलासा

सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर संदीप नाहर झाला होता अस्वस्थ, झाला खळबळजनक खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देसुचिताने सांगितले की, संदीप त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या किंवा करिअरमधल्या अडचणींबद्दल कधीही सेटवर तक्रारी करायचा नाही. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने त्याला खूप मोठा धक्का बसला होता.

अभिनेता संदीप नाहरने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला. त्याने एम. एस. धोनी, केसरी या चित्रपटांमध्ये काम केले होते. दिवंगत सुशांत सिंग रजपूतने एम.एस. धोनी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात संदीपने त्याच्या मित्राची भूमिका साकारली होती. सुशांतने 14 जूनला आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर संदीप अस्वस्थ झाला होता असे नुकतेच अभिनेत्री सुचिता पिल्लईने एका मुलाखतीत सांगितले. 

सुचिताने सांगितले की, संदीप त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या किंवा करिअरमधल्या अडचणींबद्दल कधीही सेटवर तक्रारी करायचा नाही. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने त्याला खूप मोठा धक्का बसला होता. कोणी आत्महत्येसारख्या गोष्टीचा विचार देखील कसा करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्यामुळे आम्हाला चांगलाच धक्का बसला आहे.

सुचिता आणि संदीप यांनी कहने को हमसफर है मध्ये एकत्र काम केले होते. संदीपचा मृतदेह गोरेगावमधील त्याच्या घरात सापडला होता. फेसबुकवर जवळपास मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी त्याने एक सोशल मीडिया पोस्टही लिहिली होती. 

संदीप नाहरने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलेलं?

"आता जगण्याचीच इच्छा उरलेली नाही. जीवनात अनेक सुखदु:ख पाहिली. पण, सध्याच्या घडीला मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे योग्य नाही मला माहिती आहे. मलाही जगायचे होते. पण जिथं सेल्फ रिस्पेक्ट नाही, समाधान नाही तिथे जगून काय फायदा. माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधीच समजून घेतले नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको हायपर आहे. तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. रोजचीच भांडणं ऐकण्याची ताकद माझ्यात नाही. यामध्ये तिची काहीही चूक नाही, तिला सर्वकाही सुरळीत वाटतं. पण माझ्यासाठी हे सामान्य नाही."

"मी कित्येक वर्षांपासून मुंबईत आहे. मी वाईट वेळही पाहिली पण कधी खचलो नाही. बाऊन्सर होतो, डबिंग केलं, जीम ट्रेनरही होतो. वन रूम किचनमध्ये सहा जण राहायचो. स्ट्रगल करत होतो पण समाधानी होतो. आज मी सगळे काही मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. दोन वर्षांपासून आयुष्य पूर्ण बदललं आहे आणि हे सर्वकाही मी कुणासोबत शेअरही करू शकत नाही. जगाला वाटतं आमचं सर्व किती चांगलं सुरू आहे. कारण ते आमची सोशल मीडियावरील पोस्ट पाहतात. जे सर्वकाही खोटं असतं. जगाला दाखवायला. इमेज चांगली राहावी यासाठी हे टाकतो पण खरं एकदम विरुद्ध आहे. आमचं अजिबात पटत नाही."

"मी आत्महत्या खूप आधीच केली असती. पण मी स्वतःला वेळ दिली. सर्वकाही ठीक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केलं. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदानं उचलावं लागेल. इथं या आयुष्यात नरक मिळालं कदाचित इथून गेल्यानंतर तिथलं आयुष्य कसं असेल मला माहिती नाही. पण मला इतकं माहिती आहे, मी त्याचा सामना करेन. एक विनंती आहे, मी गेल्यानंतर कांचनला काहीही बोलू नका, फक्त तिच्या मेंदूचा उपचार जरूर करून घ्या", असं त्यानं फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.

Web Title: Sandeep Nahar Was Affected by Sushant Singh Rajput's Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.