'आम्ही आमच्या 7 वर्षाच्या मुलाला सिनेमा दाखवला'; Animal वर टीका करणाऱ्यांना दिग्दर्शकाचं थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 12:06 IST2024-02-07T12:05:22+5:302024-02-07T12:06:04+5:30
Sandeep reddy vanga: रणबीरच्या सिनेमाची जितकी चर्चा झाली त्याच्यापेक्षा कैकपटीने लोकांनी या सिनेमाला ट्रोल केलं.

'आम्ही आमच्या 7 वर्षाच्या मुलाला सिनेमा दाखवला'; Animal वर टीका करणाऱ्यांना दिग्दर्शकाचं थेट उत्तर
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) याचा animal हा सिनेमा रिलीज होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, या सिनेमाशी निगडीत सुरु असलेले वाद अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीत. अनेकांनी या सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत टीका केली आहे. अनेकांच्या मते, हा सिनेमा कुटुंबासोबत एकत्र बसून पाहण्यासारखा नाही. यामध्येच आता सिनेमाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा यांनी (Sandeep Reddy Vanga) यांनी त्यांच्या कुटुंबाला तो सिनेमा कसा वाटला हे सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया काय होती हे सुद्धा त्यांनी सांगितलं.
"अलिकडेच संदिप रेड्डी वांगा यांनी सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सिनेमाविषयी त्यांच्या कुटुंबियांचं मत काय होतं हे सांगितलं. animal मध्ये जे काही सीन दाखवले त्यावर तिचा (पत्नीचा) काहीही आक्षेप नव्हता. ती मला काहीच बोलली नाही. पण, त्यात जे अतिरंजित हाणामारीचे सीन होते ते तिला फारसे पटले नाहीत. मी माझ्या मुलाला सुद्धा हा सिनेमा दाखवला", असं संदिप वांगा म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आम्ही काय केलं जे सीन मुलाला दाखवता येणार नाहीत ते सीन एडीट केले त्यानंतर त्याचं वेगळं व्हर्जन हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करुन तो सिनेमा त्याला दाखवला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही गोव्याला गेलो होतो. तेव्हा त्याने हा सिनेमा पाहिला. माझ्या लेकाला सिनेमातला अंडरवेअरचा सीन फारच वेगळा वाटला. त्यावर त्याने काही गंमतीशीर प्रश्न सुद्धा विचारले. पण, मला त्यावर काही बोलता आलं नाही."
दरम्यान, मी कशा प्रकारचे सिनेमा करतो याची सगळी कल्पना माझ्या पत्नीला आहे आणि तिच माझी खरी समिक्षक आहे. मला घरातूनच प्रामाणिकपणे प्रतिसाद मिळतो. संदिप रेड्डी वांगा यांच्या animal या सिनेमाने आतापर्यंत ९०० कोटींची कमाई केली आहे. मात्र, लोकप्रियतेसोबतच त्यांना टीकेचंही धनी व्हावं लागलं.