Tipu Film Motion Poster: 'टीपू'चा क्रूर चेहरा येणार चित्रपटातून समोर , निर्माते संदीप सिंग म्हणाले-'त्याला सुल्तान म्हणू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:53 PM2023-05-05T15:53:24+5:302023-05-05T17:04:18+5:30

टीपू सुल्तानच्या जीवनावर आधारित टीपू या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Sandeep singh and rashmi sharma announce the tipu movie show the cruel face of mysore king | Tipu Film Motion Poster: 'टीपू'चा क्रूर चेहरा येणार चित्रपटातून समोर , निर्माते संदीप सिंग म्हणाले-'त्याला सुल्तान म्हणू नका'

Tipu Film Motion Poster: 'टीपू'चा क्रूर चेहरा येणार चित्रपटातून समोर , निर्माते संदीप सिंग म्हणाले-'त्याला सुल्तान म्हणू नका'

googlenewsNext

टीपू सुल्तानच्या जीवनावर आधारित टीपू या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. इरॉस इंटरनॅशनल या चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्याचबरोबर संदीप सिंग आणि रश्मी शर्मा एकत्रितपण या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा ऐतिहासिक चित्रपट म्हैसूरचा राजा टीपू सुलतानच्या जीवनावर आधारित असेल. टीपूच्या आयुष्यातील दोन पैलू चित्रपटात दाखवले जाणार आहेत.


टीपू  चित्रपट हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. मोशन पोस्टरशिवाय त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. यामध्ये टीपू सुलतान दिसतो. 

मोशन पोस्टरमध्ये माहिती दिली आहे की, 8000 मंदिरे पाडण्यात आली, 27 चर्च उद्ध्वस्त करण्यात आले आहे. 40 लाख हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना गोमांस खाण्यास भाग पाडले. १ लाख हिंदूंना तुरुंगात टाकले. 2000 ब्राह्मण कुटुंबे उद्ध्वस्त झाली. टीपू सुल्तानचा जिहाद १७८३ पासून सुरू झाला


यापूर्वी, इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करताना, चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी लिहिले की, ''टिपू सुल्तानचे सत्य जाणून मला धक्का बसला आहे. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. सत्यघटनेवर आधारित असे चित्रपट बनवण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. त्यामुळे या चित्रपटातून त्याच्याशी संबंधित सत्य समोर येणार आहे.  मला वाटते की, अत्याचारी टिपू सुल्तान काय होता हे लोकांना माहीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे हा चित्रपट 70mm वर प्रदर्शित करण्याची माझी इच्छा आहे. त्याला सुल्तान म्हणू नये असे माझे मत आहे. माझे ब्रेनवॉश करण्यात आले होते. जसे की, आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात सांगण्यात आले आहे की, तो एक पराक्रमी व्यक्ती होता. पण त्याची क्रूर बाजू कुणालाही माहीत नाही. मी भविष्यातील पिढ्यांसाठी त्याची काळी  बाजू समोर आणार आहे.

 

Web Title: Sandeep singh and rashmi sharma announce the tipu movie show the cruel face of mysore king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.