संदीप सिंहने सुशांतसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स केले शेअर, म्हणाला - 'मला माफ कर भावा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 02:25 PM2020-09-07T14:25:10+5:302020-09-07T14:25:34+5:30
संदीपने सुशांतसोबत झालेल्या चॅटींगचे स्क्रीनशॉट्स शेअर करत अशा लोकांना उत्तर दिलंय जे या दोघांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित करत होते.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर संशयाच्या जाळ्यात आलेला त्याचा मित्र संदीप सिंहने रविवारी सोशल मीडियावर काही पोस्ट करून त्याच्याकडून स्पष्टीकरण दिलं आहे. संदीपने सुशांतसोबत झालेल्या चॅटींगचे स्क्रीनशॉट्स शेअर करत अशा लोकांना उत्तर दिलंय जे या दोघांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित करत होते. सोबतच त्याने सुशांतची मोठी बहीण आणि भावोजीसोबतचं चॅटींग शेअर करत सांगितलं की, सुशांतचा परिवार त्यांना ओळखत होता.
संदीपने सुशांतसोबतच्या चॅटींगचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, 'माफ करा भावा, मी गप्प बसल्याने माझी २० वर्षांची इमेज आणि परिवाराचे तुकडे झाले आहेत. मला हे माहीत नव्हतं की, मैत्रीसाठी सर्टिफिकेटची गरज असते. आज मी आपल्या खाजगी चॅटींगला सार्वजनिक करत आहे. कारण आपल्यातील मैत्रीला सिद्ध करण्याचा हा शेवटचा उपाय आहे.
संदीपने सुशांत यांच्यात झालेल्या चॅटींगचे पाच स्क्रीनशॉट्स शेअर केलेत. हे नोव्हेंबर २०१६ आणि जून २०१८ चे आहेत. यातील ९ नोव्हेंबर २०१६ च्या चॅटींगमध्ये सुशांत संदीपला म्हणाला आहे की, 'माझ्याकडे असे मित्र नाही जे माझ्याजवळ असले पाहिजे, पण असं नाहीये. माझ्याकडे फक्त शेट्टी आहे आणि तुझंही स्वागत आहे भाई'.
तुझ्या बहिणीसोबत उभं राहून चूक केली का?
त्यानंतर शेअर केलेल्या एका नोटमध्ये त्याने सुशांतचा मृत्यूचा दिवस आठवत लिहिले की, '१४ जूनला जेव्हा मी तुझ्याबाबत ऐकलं तेव्हा मी स्वत: ला रोखू शकलो नाही आणि दु:खी होऊन तुझ्या घरी पोहोचलो. पण मला बघून आश्चर्य वाटलं की तिथे मीतू दीदी शिवाय कुणीही नव्हतं. मी अजूनही विचार करत आहे की, त्या दु:खद क्षणाला मी तुझ्या बहिणीच्या बाजूला उभं राहून चूक केली का किंवा तुझ्या इतर मित्रांची येण्याची वाट बघायची असती का?
संदीपने सुशांतची बहीण आणि भावोजीसोबत जे बोलणं झालं त्याचाही स्क्रीनशॉट शेअर केला. हे चॅटींग सुशांतच्या मृत्यूनंतर १५ जून, १७ जून, २१ जून आणि १ जुलैचं आहे. या चॅटमध्ये संदीप आणि सुशांतच्या बहिणीत मीडियासाठी एक प्रेस नोट जारी करण्याबाबत बोलणं सुरू होतं. सोबतच मीतूने संदीपला सुशांतचं डेथ सर्टिफिकेटही आणण्यास सांगितले होते.
त्यासोबतच मीतूने सुशांतची बॉडी नेणाऱ्या अॅम्बुलन्सच्या पेमेंटबाबतही प्रश्न विचारत आहे. ज्यावर संदीपने सांगितले की, ते झालंय. एका चॅटमध्ये संदीप कुणी नीलोत्पलबाबत विचारताना सांगतो की, ते माझ्यावर चुकीचे आरोप लावत आहेत. ज्यानंतर मीतू त्याला सांगते की, ती कोणत्याही नीलोत्पलला ओळखत नाही.
हे पण वाचा :
सुशांतच्या केसनंतर चर्चेत आलेल्या संदीप सिंहची A to Z माहिती, आयस्क्रीम विकणारा कसा बनला प्रोड्युसर