तू है तो दिल धडकता है… दुबईत नक्की कोणासोबत फिरतेय सानिया मिर्झा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:25 IST2024-10-15T15:24:44+5:302024-10-15T15:25:26+5:30
सानियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

तू है तो दिल धडकता है… दुबईत नक्की कोणासोबत फिरतेय सानिया मिर्झा?
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने जगभरात नाव कमावलं आहे. सानिया गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. सानिया तिचा पती आणि क्रिकेटपटू शोएब मलिपासून वेगळी झाली. तर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं. तर यातच आता सानियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सानिया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती फावल्या वेळात आपल्या मुलासोबत वेळ घालवते. याची झलक पोस्टद्वारे ती चाहत्यांना दाखवत असते. आताही सानियाने आपल्या मुलासोबत दुबईमध्ये वेळ घालवला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सानिया ही बहीण आणि मुलांसोबत दुबईतील एका मॉलमध्ये फिरताना दिसतेय.
शोएब मलिकपासून वेगळे झाल्यानंतर सानिया एकटीच आहे की कुणाला डेट करतेय, याचा खुलासा तिने केलेला नाही. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या.